राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात माजी विद्यार्थी व पालक सभा संपन्न

197

#saoli #rahstrapitamahatma #chandrapur #gadchiroli #university

सावली :- सौरव गोहणे 
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली येथे माजी विद्यार्थी व पालक समितीच्या वतीने महाविद्यालयाच्या सभागृहात माजी विद्यार्थी व पालक सभा दिनांक 04 मार्च 2023 ला घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ.अशोक खोब्रागडे तर सभेला सुरज बोम्मावार, शतपाल दुधे, मृणाल गोलकुंडावर, सागर गेडाम, वैभव लोणबले, ममता वाढई, रूपाली नागोसे, प्रफुल निरुडवार, रोशन तिवाडे, इत्यादी माजी विद्यार्थी पालक उपस्थित होते. या सभेत महाविद्यालयाच्या विकासाच्या संदर्भात व विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्न आणि समस्यांवर चर्चा करण्यात आली.

सभेचे अध्यक्ष कार्यकारी प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्न व समस्यावर सकारात्मक उत्तर दिले. या सभेचे प्रास्तविक समितीचे समन्वयक प्रा. विनोद बडवाईक यांनी केले. सभेचे संचालन डॉ. रामचंद्र वासेकर तर आभार प्रा. देवीलाल वाताखेरे यांनी मानले. सभेला प्रा. प्रशांत वासाडे, प्रा. महानंदा भाकरे, प्रा. संदिप देशमुख प्रा. सगानंद बागडे, डॉ. विजयसिंग पवार, डॉ. दिलिप कामडी, डॉ. दिवाकर उराडे, प्रा. दिलिप सोनटक्के, डॉ. भास्कर सुकारे , डॉ. प्रफुल वैराळे, डॉ. प्रेरणा मोडक, डॉ. राजश्री मार्कंडेवार डॉ. किरण बोरकर डॉ. रागिनी पाटील डॉ. सचिन चौधरी प्रा.प्रकाश घागरगुंडे, प्रा. मुकेश निखाडे प्रा. आशिष शेंडे प्रा. स्मिता राऊत इत्यादी प्राध्यापक उपस्थित होते.