थकबाकी भरणाऱ्या कृषिग्राहकाचा मुख्य अभियंत्यांच्या हस्ते

478

#chandrapur #saoli #engeeniar #farmer

चंद्रपूर २७ फेब्रुवारी २०२३

चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांच्या आवाहनास साद देत गडचांदूर येथील प्रतिष्ठित नागरिक व कृषिग्राहक – श्री. डी. एच. पुरी यांचे पुत्र श्री. उदध्व पुरी यांनी त्यांच्याकडे असलेल्या कृषिपंपाच्या ९७ हजार ८५० रुपये थकबाकीचा एकरकमी भरणा केला. मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांनी स्वतः, कृषिग्राहक श्री.ङि एच. पुरी यांचे पुत्र श्री. उदध्व पुरी यांचा त्यांच्या शेतात जाऊन थकबाकी भरल्याबद्दल सत्कार केला. मुख्य अभियंत्यांच्या या भेटी प्रसंगी इतर उपस्थित कृषिग्राहकांनी ३१ मार्च पूर्वी लवकर वीजबिल भरण्याचे आशवासन मुखय अभियंता यांना दिले. यांप्रसंगी, गडचांदूर उपविभागाचे उप कार्यकारी अभियंता श्री. अतुल इंदूरकर व चंद्रपूर परिमंडळात कार्यरत उव्यवस्थापक (वि. व. ले.) श्री. प्रदीप जिंदे हे उपस्थित होते.

कृषिग्राहक श्री. उदध्व पुरी यांच्या कडे असलेल्या असलेल्या थकबाकीपैकी २४ हजार ५५० यापूर्वी भरले होते तसेच ३१ मार्च २०२३ पर्यंत असलेल्या विजबिलात ३० टक्के माफीचा लाभ त्यांना मिळाला व त्यांना ५५ हजार रुपयांची माफी मिळाली. कृषिपंपाच्या विजबिलात ३० टक्के माफीचा लाभ इतरही कृषिग्राहकांनी ३१ मार्च २०२३ पर्यंत घ्यावा असे आवाहन मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांनी केले आहे.

महावितरणने कृषीग्राहकांची काळजी घेत, राज्यभरात डिसेंबरमध्ये १७ हजार ७८५ जानेवारीमध्ये ८ हजार ४०४ व ८ फेब्रुवारीपर्यंत २ हजार २४१ असे एकूण २८ हजार पेक्षा जास्त नादुरुस्त रोहित्र केवळ दोन ते तीन दिवसांच्या कालावधीत बदलले. चंद्रपूर परिमंडळात ५००च्या जवळपास रोहित्रे बदलली आहेत.

परंतु थकबाकीचा डोंगर वाढल्याने आता बडे अधिकारीही वसुलीसाठी ग्राहकांच्या अंगणात सरसावले आहेत. चंद्रपूर परिमंडळात – चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील घरगुती, वाणिज्यिक, औदयोगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणिपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी २४२ कोटी ९० लाखाच्या घरात पोहेाचली असून कृषिग्राहकांनी थकबाकी न भरल्यामुळे ८१ हजारपेक्षा जास्त कृषिपंपांची थकबाकी ही २५० कोटी ७६ लाखाच्या घरात पोहेाचली आहे. तर ५ ते १० वर्षापासून १६ हजार ५३२ कृषिग्राहकांनी ८८ कोटी ७० लाख भरले नाही. अशी एकंदरीत ४९३ कोटीं थकबाकीचा डोंगर निर्माण झाला आहे.