
#maharashtra #chandrapur #jilhaparishad #nurse

महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटना राज्य सरचिटणीस पदी रंजना कोहपरे तर नागपूर विभागीय उपाध्यक्ष पदी गीता खामनकर यांची निवड करण्यात आली व त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे
दिनांक26/02/2023 रोजी नाशिक मध्ये र. न. 3130 महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटनेची 11 वी त्रैवार्षिक आमसभा शोभाताई खैरनार यांच्या उपस्थितीत पार पडली.
महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हा प्रतिनिधी या आमसभेत उपस्थित होत्या. महासंघाचे सरचिटणीस महांकर सर यांनी यात उपस्थिती लावली,सर्व नर्सेस संघटनेचे राज्यपदाधिकरी उपस्थितीत होते.
राज्यातून आलेल्या सर्व जिल्ह्यातील जिल्हा प्रतिनिधी यांनी राज्य सरचिटणीस पदी रंजना कोहपरे जिल्हा चंद्रपूर तर नागपूर विभागीय उपाध्यक्ष पदी गीता ताई खामनकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.माणसं अध्यक्ष पदी आदरणीय शोभाताई खैरनार जिल्हा नाशिक यांची तर राज्य अध्यक्ष मीनाक्षी मुदगल जिल्हा पुणे,कोषाध्यक्ष म्हणून आम्रपाली गागुर्डे जिल्हा नाशिक,कार्याध्यक्ष नागपुर मधुन कविता बोंद्रे तर राज्य उपाध्यक्ष पदी ज्योती बांगार जिल्हा हिंगोली,शांत पवार जिल्हा सातारा यांची एकमताने निवड करण्यात आली.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे स्वागत नाशिक शहरात मोठ्या जल्लोषात करण्यात आले.जिल्हा चंद्रपूर येथून राज्य कार्यकारिणी साठी चंद्रपूर जिल्हा कोषाध्यक्ष शिल्पा वैद्य जिल्हा संघटक आशा नक्षिने उपस्थित होत्या.
