बल्हारशाह पॉवर हाऊस परिसरात बिबट मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ

191

#forest #rajura #tiger #death #chandrapur

राजुरा,(संतोष कुंदोजवार)-
वन विभागाचे बल्हारशाह वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बल्हारशाह चंद्रपूर महामार्गातील महापारेषन पॉवर हाऊस परिसरात बिबट मृतावस्थेत असल्याची माहिती दुपारी तीन वाजता उघडकीस आल्याने खळबळ उडाली असून वनकर्मचारी मोका पंचनामा करून बिबटचा शवविच्छेदन करण्यासाठी वन्यजीव उपचार केंद्र चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे
आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पॉवर हाऊस मधील विद्यतु कर्मचाऱयांनी या परिसरातील झुडपात बिबट मृतावस्थेत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांना दिली ,माहिती मिळताच अधिनस्त वनकर्मचार्याना घेऊन मोकास्थळी जाऊन पंचनामा केला असता बिबट कुजण्याची अवस्थेत असून पूर्ण अवयव शाबूत आढळून आले
याची माहिती वरिष्ठ वन अधिकाऱयांना देण्यात आली आणि मार्गदर्शनात मृत बिबट्याचा शवविच्छेदन व पुढील कारणमीमांसा स्पष्ट करण्यासाठी वन्यजीव उपचार केंद्र,ताडोबा अंधारी प्रकल्प चंद्रपूर येथे नेण्यात आले आहे आणि प्राथमिक वन गुन्हा दाखल करण्यात आला
पुढील तपास उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू ,सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे करीत आहे