
#bjp #chandrashekharbavankule #chandrapur #maharashtra #saoli

पाथरी :- भाजपा प्रणित केंद्र शासन व राज्य शासनाचा वतीने अनेक लोकोपयोगी योजना सर्वत्र सुरू आहेत प्रत्येक गावातील लाभार्थ्यांच्या घराघरात योजना पोहोचत आहेत विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणकारी योजनांचा विशेषत्वाने गौरव करणे व आभार मानण्यासाठी पाथरी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमा प्रसंगी उद्घाटन म्हणून महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे होते तर त्यांनी नागरिकांना संबोधताना म्हणाले की भारत देशाला जगात नंबर एक बनवायचे काम नरेंद्र मोदीजी करीत आहेत ते शक्य झाले हे फक्त तुम्ही दिलेल्या एका मतामुळे आणि त्याचमुळे आज अनेक विविध योजना तुमच्या घराघरात पोहोचत आहेत ते म्हणजे कमळाला दिलेल्या मतामुळे तुमच्यामुळेच या देशाला जगात बलाढ्य देश म्हणून गणल्या गेलेला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खासदार अशोक नेते यांनी नरेंद्र मोदी यांनी केंद्रात व राज्यात विविध योजना अमलात आणल्या असून शेवटच्या टोकापर्यंत या योजनाचा लाभ घेत असून विविध योजनांचे मार्गदर्शन करीत या सर्व योजना सरकारने ऑनलाईन केले असल्याने भ्रष्टाचाराला आळा बसला असून याच्या फायदा थेट जनतेला होत आहेत म्हणून आज आपण पंतप्रधानांना धन्यवाद म्हणून धन्यवाद मोदीजी कार्यक्रम आयोजित केलेले आहे.यावेळी माजी आमदार प्रा.अतुल देशकर,भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी मार्गदर्शन केले.
सावली तालुक्यातुन 25 हजार पोस्ट कार्ड मोदीजी यांना पाठविण्याचा संकल्प करण्यात आला.यावेळी विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष अविनाश पाल, तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष आशिष देवतळे ,जिल्हा महामंत्री संजय गजपुरे ,जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले,माजी जीप सभापती संतोष तगडपलीवार ,सावली शहराध्यक्ष आशीष कार्लेकर, भाजप महिला जिल्हाध्यक्ष अल्काताई आत्राम, जिल्हा उपाध्यक्ष नीलम सुरमवार,तालुका अध्यक्ष पुष्पाताई शेरकी, छायाताई शेंडे , सरपंच अनिताताई ठिकरे, योगिताताई डबले, मनीषाताई चिमूरकर, तुकाराम ठिकरे, शरद सोनवाणे, अशोक ठिकरे, दिलीप जाधव, नितीन अढिया,प्रवीण वाघमारे, विनोद भैसारे, विनायक नैताम, विस्वनाथ येरमे, व समस्त भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष अविनाश पाल यांनी केले. सूत्रसंचालन माजी सभापती क्रिष्णा राऊत व आभार महामंत्री दिलीप ठीकरे यांनी मानले.यावेळी सावली तालुक्यातील सर्व बूथ चे बूथ प्रमुख व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
