
#saoli #chandrapur #watersuplia #polisstation #scam

सावली(प्रतिनिधी)
शेतात पाणी जावे म्हणून दोन लोखंडी डोंग्या लावलेले असताना ते आता बाहेर काढून ठेवले होते मात्र या लोखंडी वस्तूवर चोरट्यांनी डल्ला मारला असून या बाबत सिंचाई विभागाने सावली पोलिसात तक्रार केली आहे.
वाघोली बुट्टी उपसा सिंचन योजना अंतर्गत सामदा शेतशिवारात पाणी जाण्याकरिता कालवा आलेला असल्याने त्या कालवाच्या वरून सामदा येथील मामा तलावाचे शेताला पाणी जाण्याकरिता भांडेकर यांचे शेताजवळ लोखंडी पत्र्याची २ फुट रुंद व १२ फुट लांबीची अश्या दोन डोंग्या आडव्या स्थितीत कालव्याच्या वरून लावलेल्या होत्या त्या डोंग्या मधून शेताला पाणी जात होते.
परंतु त्या लोखंडी डोंग्यांना छेद पडल्याने व गलत असल्याने त्यांनी सदर डोंग्या काढून पाणी जाण्याकरिता नवीन सिमेंट कोन्क्रेत बांधकाम करून डोंग्या तय्यार केले. व जुन्या लोखंडी डोंग्या त्याच ठिकाणी बाजूला ठेवलेल्या होत्या. त्या कालवा निरीक्षण ज्ञानदीप कोडाप यांनी दि.10/2/2023 रोजी पाहणी करून त्याच ठीकाणी असल्याची खात्री केली होती मात्र दि .17/2/2023 रोजी अधिनस्थ काम करीत असलेले कालवा निरीक्षण ज्ञानदीप कोडाप यांनी कालव्याचे निरीक्षण करीत जात असतांना सकाळी 11/30 वा. चे सुमारास भांडेकर यांचे शेतजवळ काढून ठेवलेल्या लोखंडी पत्र्याच्या २ डोंग्या त्यांना दिसून आल्या नाही.
या संदर्भात वरिष्ठांना माहिती देण्यात आली व घटना स्थळावर जावून पाहणी केली असता सदर दोन्ही डोंग्या पत्र्याच्या डोंग्या कि.अंदाजे 20,000/-रु. दिसून आल्या नाही. सदर लोखंडी पत्र्याची २ फुट रुंद व १२ फुट लांबीची अश्या दोन डोंग्या अज्ञात चोरांनी चोरून नेल्याचे दिसून आले.त्या बाबत आजूबाजूच्या शेतकऱ्यांना व गावातील लोकांना विचारपूस करून शोध केला असता थांगपत्ता लागला नाही त्यामुळे अखेर सिंचन शाखा अभियंता कु.साईश्री सुजित नायर यांनी सावली पोलिसात तक्रार देण्यात आलेली असून पोलिसांनी अज्ञात आरोपी वर गुन्हा दाखल करून तपास कार्य सुरू केले आहे.
