Home
Homeचंद्रपूर#पाणी न मिळालेल्या नागरिकांना दोन वर्षाचे पाणी पट्टी कर माफ करणार-आमदार विजय...

#पाणी न मिळालेल्या नागरिकांना दोन वर्षाचे पाणी पट्टी कर माफ करणार-आमदार विजय वडेट्टीवार

#MLAvijaywadettiwar #saoli #nagarpanchayt #collector

सावली शहरातील अनेक जणांना गेल्या चार वर्षांपासून पाणी मिळत नाही मात्र नवीन कनेक्शन घेतांना पूर्ण पाणी कर भरल्यावर कनेक्शन मिळत नाही अशी ओरड असून आम्ही दोन वर्षाचे पाणी कर माफ करू व उर्वरित टप्याटप्याने भरावे असा प्रस्ताव नगरपंचायत च्या बैठकीत तयार करून जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती आमदार तथा माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सावली येथील कांग्रेस कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद मध्ये दिली.

सावली नगरात शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी तत्कालीन पालकमंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी १२.५० कोटीची जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली.प्रत्येक प्रभागांमध्ये नळ जोडणी देण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. त्यासाठी नवीन नळ जोडणी साठी मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचा भरणा करून जोडणी करून घ्यावे अशा प्रकारच्या अनेक अटी व शर्ती नगरपंचायत प्रशासनाकडून लावण्यात आले होते.
नगरपंचायत सामान्य फंडाच्या माध्यमातून सार्वजनिक कार्यक्रम नाली दुरुस्ती दिवाबत्ती सोय यासारखे कामे करत असताना कराच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशावर अवलंबून असते तसेच स्वच्छता अभियानामध्ये भाग घ्यायचा असेल तर आणि आदर्श नगरपंचायत करायचे असेल तर शंभर टक्के कराची वसुली करणे आवश्यक आहे त्यासाठी सावलीतील शंभर टक्के कुटुंबाने मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरावा असे आवाहन आमदार विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

सावली करांना २४/७ तास पाणीपुरवठा व्हावा यासाठी एक्सप्रेस फिडर ची निर्मिती करण्यात आली आहे. महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे चार वर्ष शहरातील पाणीपुरवठा बंद होता या दोन वर्षाचा पाणी कर पूर्णपणे माफ व्हावा तसेच उर्वरित कर टप्प्याटप्प्याने भरण्यात यावे यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

तसेच सावली नगरात रमाई भवन,नवीन बस – स्थानकाच्या मागे बगीचाचे काम, पंचायत समितीच्या बाजूला सार्वजनिक वाचनाची निर्मिती करण्यात येणार आहे.तसेच सिंचनाचे जवळपास पूर्ण कामे पूर्णत्वास आले आहेत. अशा प्रकारे संपूर्ण सावली शहरासह तालुक्याचा येणाऱ्या दिवसात कायापालट करणार असल्याचे ते बोलत होते.

मोकाट जनावर मुख्यमार्गावर फिरत असल्यामुळे काही दिवसा अगोदरच एका युवकाचा मृत्यू झाला असल्याचे निदर्शनास आणून दिले पुन्हा अशा प्रकारच्या अनुचित घटना घडू नये यासाठी मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी सूचना नगरपंचायतीला देण्यात आले.

आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार नामदेव उसेंडी, सावली नगरपंचायतच्या नगराध्यक्ष लताताई लाकडे,उपाध्यक्ष संदीप पुण्यपवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन गोहणे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक विजय मुत्यालवार सह नगरपंचायत चे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !