वितरिका स्तरीय पाणी वापर संस्था गठीत…

428

आसोलामेंढा नुतनीकरण प्रकल्प विभाग क्र.२ सावली अंतर्गत साखरी वितरिका स्तरीय पाणी वापर संस्था साखरी हि संस्था गठीत करण्यात आली. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पा मध्ये हि वितरिका स्तरीय पाणी वापर दुसरी असून या संस्थेचे नाव साखरी वितरिका स्तरीय पाणी वापर संस्था साखरी असे ठेवण्यात आले.

या संस्थेचे क्षेत्र सहा गावात असणार आहे.यामध्ये जय बजरंग पाणी वापर संस्था पेटगाव चक,जय किसान पाणी वापर संस्था जाम केरोडा,जलधारा पाणी वापर संस्था जाम बु.,वाल्मिकी पाणी वापर संस्था जीबगाव, श्री. मार्कदडेश्वर पाणी वापर संस्था साखरी, कृषी विकास पाणी वापर संस्था लोन्धोली. असे सहा गावांचे क्षेत्र नेमण्यात आले. पाणी वापर संस्थेच्या संचालक पदाकरिता निवडणूक लढविण्यात आली. सदर निवडणूक आठवले साहेब सहाय्यक अभियंता श्रेणी १ व  राखुंडे साहेब कनिष्ठ अभियंता आसोलामेंढा नुतानिकरण प्रकल्प सावली यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत बारा संचालक अविरोध निवडून आलेत. यात श्रीकृष्ण बोधलकर, सूर्यभान मडावी, नामदेव हुलके, रेवन खेर, नामदेव नैताम, मेहबूब पठाण, बापुजी भोयर, बाळकृष्ण चौधरी, दिलीप पाटील लटारे, मदन दुर्गे, कविताताई बोधालकर, पुंडलिक वाकडे, राजू कुनघाडकर यांचा समावेश आहे. संचालका मधून अध्यक्ष व सचिव निवड सभा पुढील नियोजित तारखेत गट समन्वयक कार्यालय सावली येथे घेण्यात येईल.

सदर निवडणूक प्रक्रिया मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था मुंबई विद्यापीठाचे गट समन्वयक चेतन उंदिरवाडे, प्रशिक्षक  यशवंत कवाडे, सामाजिक कार्यकर्ते प्रविण ढाकुलकर व क्षेत्रीय समन्वयक  शुभम प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.