
#chandrapur #wadsa #accident #truck #nexon #car # death #mul

मुल (प्रतिनिधी) चंद्रपूर मार्गावरील महादवाडी गावापासून 1 किमी वर असलेल्या वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने वडसा येथील 22 वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी साडेचार वाजताच्या। सुमारस घडली आहे.सविस्तर बातमी मुल वरून चंद्रपूरला माल भरण्याकरता करिता जात असलेला ट्रक क्रमांक एम.एच. 04 ई.एल. 7100 ला चंद्रपूर वरून डॉक्टर कडे उपचारकारिता गेलेल्या 22 वर्षीय तरुण कन्नमवार वार्ड वडसा येथील रहिवासी पवन अनिल परसवानी आपल्या टाटा नेक्सन क्रमांक एम.एच. 33 व्ही. 1914 या चारचाकी वाहनाने परत आपल्या गावाला जात असतांना महादवाडी गावाजवळ समोरासमोरुन जोरदार धडक दिल्याने पवन जागीच ठार झाला.
याची माहिती जागरूक नागरिकांनी मुल पोलीस स्टेशन ला दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन कार मध्ये फसलेल्या पवनला बाहेर काढून शवविच्छेदना प्रेत उपजिल्हा रुग्णालायत पाठविण्यात आले. हा अपघात इतका भिषण होता कारची समोरील बाजू पूर्ण दबून गेली होती. पवन परसवानी हा काल उपारकारिता डॉ. दासरवार यांचे कडे गेला होता. रात्र चंद्रपूरलाच मुक्काम करून पहाटे 4 वाजता वडसा करिता निघाला होता.
या घटनेची माहिती नातेवाईकांना होतच त्यांनी मुल येथील उपजिल्हा रुग्णालायत गर्दी केली होती. आरोपी ट्रक चालक पांडुरंग रावसाहेब काळे याला पोलिसांनी अटक केली असून मुल पोलीस पुढील तपास करित आहेत. प्रेत शवविच्छेदनानंतर कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.
