
#mahashivratri #saoli #deotok #chamorshi

सावली(सूरज बोम्मावार)
सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या उत्तर वाहिनी काठावर असलेल्या प्रसिद्ध श्री पुण्यभूमी तीर्थक्षेत्र मुरकुंडेश्वर पंच कमिटी देवस्थान च्या वतीने दिनांक 17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी पर्यंत महाशिवरात्री यात्रा व अभिषेक सोहळ्याचे व गोपालकाल्याचे आयोजन केले आहे.
तसेच दिनांक 15 फरवरी पासून देवटोक ,जीबगाव,पेडगाव ,जाम साखरी,लोंढोली, हरंबा, शिरशी ते देवटोक या पालखी मार्गाने सुद्धा पालखीचे प्रस्थान होणार आहे.
दिनांक 17 फेब्रुवारी ला सायंकाळी 6 वाजता परमपूज्य संत श्री मुरलीधर महाराज,देवटोक यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे.
त्यानंतर रात्रौ 9 वाजता भजन व किर्तन प्रस्तुत शिवरंजन मंडळ यांच्या हस्ते प्रस्तुत करणार आहे. त्यानंतर दिनांक 18 फरवरी शनिवारला सकाळी 10 वाजता ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री यांच्या शुभहस्ते अभिषेक सोहळा पार पडणार आहे. यावेळी माजी जि प बांधकाम सभापती दिनेश पाटील चिटनूरवार, माजी पंचायत समिती सभापती राकेश गड्डमवार यांची उपस्थिती लाभणार आहेत.
तसेच दुपारी 12 वाजता गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या उपस्थितीत अभिषेक सोहळा पार पडणार आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार,भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश पाल, भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार यांची उपस्थिती लाभणार आहे.
सायंकाळी 5 वाजता 1000 महादीप प्रज्वलन करून गंगा आरती पार पडणार आहे.
तर रात्रौ 9 वाजता सामूहिक भजन विविध गुरुदेव मंडळ च्या वतीने आयोजित केलेले आहे.
दिनांक 19 रविवारला सकाळी दहा वाजता गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव होळी यांच्या शुभहस्ते अभिषेक पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता हनुमानजी आसेकर,गायत्री परिवार यांच्या हस्ते सुगम संगीत पार पडणार आहे.
दुपारी 2 वाजता गोपालकाला आयोजन केला असून 3 वाजेपासून महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे या कार्यक्रमाला साखरी चे सरपंच ईश्वरदास गेडाम, उपसरपंच दादाजी किंहेकार, जाम सरपंच वर्षा गेडाम,उपसरपंच श्याम गायकवाड, जीबगाव सरपंच पुरुषोत्तम चुधरी, उपसरपंच इंदिरा भोयर,लोंढोली सरपंच उष्टुजी पेंदाम,उपसरपंच प्रमोद खोब,हरंबा सरपंच अश्विनी बोदलकर,उपसरपंच प्रवीण संतोषवार,तसेच सर्व सदस्य व भक्तगण नागरीक व पंचकमिटी देवस्थानचे संचालक मंडळ उपस्थित राहणार असून या महाशिवरात्री यात्रा व अभिषेक सोहळ्याला हजारोच्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री पुण्यभूमी तीर्थक्षेत्र मुरकुंडेश्वर पंच कमेटी देवस्थान देवटोक(शिरशी)च्या वतीने केले आहे.
