नळाचा पाणी मिळाला नाही तरी तक्रार करू नका… नव्या अजब करारनाम्याने नागरिक अचंबित

785

#saoli #nagarpanchayt #water #chandrapur #public

 

*सावली(सूरज बोम्मावार)*
पाणी देण्याचे सोडून कमी पाणी मिळाला तर तक्रार करू नका अशी अट टाकीत नवीन हमीपत्र भरून घेत असल्याने नागरिकांमध्ये सावली नगरपंचायत विरोधात प्रचंड रोष व्यक्त केल्या जात आहे.

सावली शहरात सध्या नवीन नळ योजनेचे कनेक्शन देण्याचे काम सुरू असतानाच कनेक्शन देण्यापूर्वी प्रत्येक नागरिकांकडून पंधराशे रुपये अनामत रक्कम व करारनामा करून घेण्यात येत आहे मात्र करारनाम्यातील अटी पाहून अनेक नागरिकच आश्चर्यचकित होत असल्याचा दिसत आहे.

सावली शहरांमध्ये 12 कोटीची नवीन पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली.यासाठी तत्कालीन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रयत्न केले होते.पाणी 2 वर्षात मिळणार होते मात्र आता ही योजनेला चार वर्ष लागलेले आहे.

पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून सावली शहरातील प्रत्येक कुटुंबीयांना घरोघरी नळाचे कनेक्शन द्यावे या दृष्टिकोनातून नगरपंचायत ही नवे जाचक अटी टाकून कनेक्शन देण्याचे काम सुरू करत असल्याचा प्रकार या निमित्ताने पुढे येत आहे.

सावली शहरात यापूर्वी सुद्धा नळ योजना होती त्या नळ योजने चे काम हे नवीन पाणीपुरवठाचे योजनेमुळे तब्बल गेल्या तीन ते चार वर्षापासून रखडलेले होते.

सदर योजनेतून पाणी देण्यास नगरपंचायत सपशेल अपयशी ठरली होती या संदर्भातून अनेक नागरिकांमध्ये संताप सुद्धा होता नळाला पाणीच नाही तर टॅक्स कसा असा प्रश्न उपस्थितही करण्यात आलेला होता. निवडणुकीच्या काळात मात्र सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पाणी नाही तर टॅक्स घेऊ नये अशा पद्धतीची भूमिका बजावली होती. मात्र आता गेल्या तीन ते चार वर्षापासून चा टॅक्स हा तब्बल चार ते पाच हजार रुपयांचा अतिरिक्त नागरिकांकडून वसूल केल्या जात आहे.

जर तुम्हाला नवीन कनेक्शन घ्यायचे असेल तर तुम्हाला जुना टॅक्स भरावेच लागेल नाहीतर मिळणार नाही अशी हेकेखोरी सावली नगरपंचायत करत असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात नगरपंचायत चे अनेक नगरसेवक ही अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे मग हा प्रकार कोण करत आहे असा प्रकारे या निमित्ताने पुढे येत आहे.

नगरपंचायतच्या नवीन नळ योजनेच्या संदर्भातून करण्यात आलेला करारनामा क्रमांक 7 मध्ये ‘पाणीपुरवठा कमी मिळाल्यास त्याबाबत तक्रार करणार नाही’ अशा पद्धतीची अट घालण्यात आलेली आहे. मात्र सदर पाणीच मिळाला नाही तर तक्रार का करायची नाही असा प्रश्न सुद्धा या निमित्ताने नागरिक विचारू लागलेले आहे.

हमी पत्रातील अनेक देण्यात आलेल्या अटी सुद्धा जाचक असल्याचे दिसते आहे. या अटीच्या संदर्भात कांग्रेस चे नगरसेवक प्रीतम गेडाम यांनी पाणीपुरवठा अभियंता दुधबळे यांना विचारणा केली असता, ‘आहे ते बरोबर आहे तुम्हाला काय करायचे ते करून घ्या’ अशा पद्धतीचे उर्मट भाषा सुद्धा बोललेले असा आरोप प्रीतम गेडाम यांनी केला आहे. त्यामुळे नागरिक आता दाद मागायची तर कुणाकडे असा प्रश्न सुद्धा आता या निमित्ताने पुढे येऊ लागलेला आहे.

नगरपंचायतच्या या अजबच्या हमीपत्राने नवीन कनेक्शन घेणारे मात्र चांगले संतापले असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे नगरपंचायतच्या या अनागोंदी कारभारांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा या निमित्ताने नागरिक करू लागले आहे.

*बॉक्स*….
*कनेक्शन देण्याचे सोडून हमी पत्र कशाला-सतीश बोम्मावार, विरोधी गट नेता,नप सावली*

आधीच योग्य रित्या पाणी पुरवठा सुरू नाही तसेच जुने ज्यांना पाणी मिळाले नाही त्यांचे टॅक्स माफ करा अशी मागणी मी स्वतः मासिक सभेत केली आहे.मात्र ज्या नागरिकाला पाण्याची गरज आहे ते जर आपले टॅक्स भरून कनेक्शन घेत असेल तर त्यानां सरळ सरळ लावून देण्याऐवजी या जाचक अटी कशाला टाकता. हर घर नल ही केंद्राची मोदी सरकार ची योजना आहे त्याची अंमलबजावणी करण्यात सावली नगरपंचायत सपशेल अपयशी ठरत असल्याचा आरोप विरोधी पक्ष गट नेता तथा नगरसेवक सतीश बोम्मावार यांनी केली आहे.