Home
HomeBreaking Newsसमोर असलेल्या चारचाकी वाहनाला ओव्हर टेक करणाच्या नादात विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला...

समोर असलेल्या चारचाकी वाहनाला ओव्हर टेक करणाच्या नादात विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला दिली जोरदार धडक

 

मुल(प्रतिनिधी) समोर असलेल्या चारचाकी वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात विरुद्ध दिशेने येणाऱ्या बस च्या धडकेत 2 तरुण जागीच ठार झाले असून बस पलटी झाल्याने बस मधील काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे.

आज दिनांक 13 ला सकाळी 10 वाजताच्या सुमारास फिस्कुटी वरून मुलला आपल्या दुचाकी ने येत असलेले 27 वर्षीय प्रफुल गुरुनुले आणि 31 वर्षीय संदीप कोकोडे हे दोघेही येत असतानाच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक एम.एच. 07 सी 9158 ही मुल वरून चामोर्शी ला जात असताना मुल वरून 2 कि.मी. वर असलेल्या उमानदी च्या पुला अगोदर असलेल्या एका छोट्या पुलाजवळ दुचाकी स्वाराने समोर असलेल्या चारचाकी वाहणाला ओव्हरटेक करण्याच्या नादात बसला जोरदार धडक दिली. त्यात दोन्ही दुचाकिस्वार प्रफुल गुरुनुले (27 वर्ष) आणि संदीप कोकोडे( 31 वर्ष)हे जागीच ठार झाले. तर बस मधील प्रवासी मात्र सुखरूप बचावले, दुचाकी स्वारांना वाचविण्याच्या प्रयत्नात बस पलटी झाल्याची माहिती बसच्या चालकांनी आमच्या प्रतिनिधी ला दिली असून बस मधील काही प्रवश्याना किरकोळ मार लागला आहे.

या घटनेची माहिती
पोलीसाना होताच घटना स्थळावर धावून आले मृतदेह शवविच्छेदना करिता उपजिल्हा रुग्णालय मुल येथे पाठवण्यात आले आहे.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !