
सावली :-

स्थानीक रमाबाई आंबेडकर विद्यालय, कनिष्ठ कला महाविद्यालय आणि माऊंट विज्ञान महाविद्यालय सावली येथे त्याग मूर्ती माता रमाई यांची जयंती संपन्न करण्यात आली.
याप्रसंगी जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थाध्यक्ष .के.एन.बोरकर यांचे हस्ते दिप प्रज्वलन करून पुष्पमाला अर्पण करून माता रमाई यांना स्मरण करण्यात आले.प्रमुख अतिथि म्हणून संचालक गोवर्धन प्राचार्य .शेंडे, पर्यवेक्षक .लाकडे,जेष्ठ शिक्षक .वरारकर,आर.पी.चौधरी, मार्गदर्शक सेवानिवृत्त शिक्षक पाटील मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांची भाषणस्पर्धा,गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली.विद्यार्थ्यानी उस्फूर्त सहभाग दर्शवून माता रमाई यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मान.के.एन.बोरकर यानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,आपली शाळा ही माता रमाई यांच्या नावाने आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी माता रमाई यांची कुटुंब वत्सलता,पतिविषयीची अतुट निष्ठा व प्रेम, चांगुलपणा,आपलेपणाची भावना,इतराविषयीची उदारता,त्याग दुसऱ्याच्या सुखात आपले सुख,हे गुण अगीकारून आपले शैक्षणिक कार्य पूर्ण केल्यास माता रमाई यांना आदरांजली ठरेल असे मत व्यक्त केले. सेवानिवृत्त पाटील यांनीसुद्धा माता रमाईच्या जिवन कार्यावर सखोल मार्गदर्शन केले
जयंती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन येवले यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.रेब्बावार यांनी मानले.कार्यक्रम शिस्तबध्द व्हावा याकरीता सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा यथोचित आनंद घेतला……
