जि.प.प्राथमिक शाळा जिबगाव येथे जागरूक पालक व सुदृढ बालक उपक्रम…

112

 

 

जिबगाव – तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय. ग्रामीण रुग्णालय सावली व प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प.प्राथमिक शाळा जिबगाव येथे दिनांक ९ फेब्रुवारी२०२३ रोजी विद्यार्थ्यांसाठी जागरूक पालक व सुदृढ बालक हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुरचित्रवाणी समाजाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला वर्ग पाच ते वर्ग बारावीच्या विद्यार्थ्याची संपूर्ण आरोग्य तपासणी व आरोग्य मार्गदर्शन करण्यात आले.

आयोजित उपक्रमाला ग्रामपंचायत सरपंच पुरुषोत्तम चुदरी.ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपल्लीवार , वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाघधरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. धनश्री मर्लावार, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जोगदंड, कृष्णाजी भिमनवार, गजानन मेश्राम.प्रभारी मुख्याध्यापक दुबे सर व शिक्षक वृंद तसेच विद्यार्थीयांची उपस्थिती होती.