जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेटगांव माल येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न…

84

 

*सावली :- सौरव गोहणे*

सावली- जि.प. प्राथ.शाळा पेटगांव (माल ) येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री.भक्तदास आभारे सहा.कार्य अधिकारी पं.स. सावली तर उद्घाटक म्हणून सौ. वर्षा गेडाम सरपंच ग्रा. पं. जांब बुज व सहउद्घाटक म्हणून उपसरपंच शामंत गायकवाड़ हे होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष भक्तदास आभारे यांनी शाळा ही समाज घडविण्याचे काम करणारी एकमेव संस्था आहे, शाळा आणि समाजात एकोपा असला की गावाची नक्कीच प्रगती होते आणि हा एकोपा,पालकांच्या शाळेविषयी असणाऱ्या आपुलकीतून आज दिसतो आहे त्यामुळे पुढील काही दिवसात पेटगांव येथील शाळा नक्कीच आदर्श शाळा म्हणून इतरांसाठी आदर्श ठरेल असे मनोगत आपल्या अध्यक्षीय भाषणातून भक्तदास आभारे यांनी व्यक्त केले.

सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध नकलाच्या माध्यमातून अंधश्रद्धा, शिक्षण व व्यसनमुक्ती या विषयावर उपस्थित जनसमुदायाचे मनोरंजनासोबतच प्रबोधन केले. सोबतच आदिवासी नृत्य,कोळी नृत्य, देशभक्तीपर व लावणी अशा विविध प्रकारचे आकर्षक नृत्यप्रकार सादर करून उपस्थित जनसमुदायाचे मनोरंजन केले.
विध्यार्थ्यांनी आपल्या मध्ये असलेल्या सुप्त गुणांची झलक दाखवली. व अनेक विध्यार्थी नि उत्तम नृत्य सादर करून आणि खास आंगनवाड़ी येथील बाल चिमुकल्यांनी सहभाग घेऊन उपस्थितीतांची दाद मिळविली याप्रसंगी रामचंद्र दहेलकर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले आदर्श पिढी घडवीण्याचे कार्य शिक्षकांच्या हातून होत असते शिक्षकांनी उत्तम विध्यार्थी घडविण्याचे कार्य करावे आजचा विध्यार्थी हा उद्याचा उत्तम नागरिक आहे असेही रामचंद्र दहेलकर यांनी आपल्या भाषणातून सांगितले. व्यासपीठावर उपस्थित ग्रामपंचायत सदस्य कांताबाई शामकुळे, रमेश गेडाम, भास्कर धानफोले, मुकरु गेडाम, शरद मडकाम, रामचंद्र दहेलकर, यदुनंदन पाल, नोमेश्वर भोयर, साईनाथ पेंदोर, मोहनशाह सोयाम से. नि. शिक्षक, निरुता सोयाम, प्रेमिला पेंदोर, दर्शना आभारे icrp, आनंदराव पेंदोर, सौरव गोहणे शाळा व्यस्थापन समितचे अध्यक्ष देवानंद आभारे, उपाध्यक्ष शकुंतला ठाकुर, मानिक डाकोटे, शीतल आभारे अ. सेविका, व अन्य मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन आर. एम. गुरनुले सर सहा,शिक्षक यांनी केले. तर आभार मुख्याध्यापक गेडाम सर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, शालेय बालमंत्रीमंडल,माता पालक गट,सर्व पालक यांनी योग्य सहकार्य केले.