सावलीत नगरपंचायत चषक प्रभाग 14 नी पटकाविला

79

 

सावली(प्रतिनिधी)

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नगरपंचायत सावलीतर्फे नगरपंचायत चषक २०२३ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मोठ्या थाटामाटात करण्यात आले.आयोजित क्रिकेट स्पर्धेत एकूण १७ प्रभागातील नगरसेवकांनी आपापली चमू व अधिकारी यांची एक चमू मैदानात उतरली होती.

मागील चार दिवसापासून सावली येथील संत योगी नारायण बाबा स्टेडियम मध्ये क्रिकेटमय वातावरण निर्माण झाले होते.आणि सावली जनतेने याचा भरपूर आनंद लुटला.

सदर क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामना हा प्रभाग क्रमांक 6( प्रायोजक आशिष बार अँड रेस्टॉरंट सावली) व प्रभाग क्रमांक 14 (प्रायोजक चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट बँक) यांच्यात झाला त्यात प्रथम क्रमांक प्रभाग क्रमांक १४ (नगरसेवक सतीश बोम्मावार)यांनी बाजी मारली तर दुसरा क्रमांक प्रभाग क्रमांक ६ (नगरसेवक ज्योतीताई शिंदे )तर तिसऱ्या क्रमांक प्रभाग क्रमांक १७ (नगराध्यक्ष लताताई लाकडे) हे ठरले विजेत्या संघाला रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले.

भूषण शिंदे याला मॅन ऑफ द सिरीज देण्यात आले. तर अंतिम सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच नितीन पाडेवार याला देण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज म्हणून भूषण शिंदे उत्कृष्ट गोलंदाज सुदर्शन भलवे ,उत्कृष्ट क्षेत्ररक्षण प्रणय चामलवार,उत्कृष्ट यष्टिरक्षक आशिष मुत्यालवार, अर्धशतक गुणवंत दूधे, उत्कृष्ट झेल आशिष मुत्यालवार, उत्कृष्ट चौकार भूषण शिंदे, उत्कृष्ट षटकार अविनाश शिंदे व प्रणय चामलवार यांना वैयक्तिक बक्षीस देण्यात आली.

समारोपीय बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष लताताई लाकडे, तर मुख्य अतिथी ठाणेदार आशिष बोरकर,उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार, विरोधी पक्षनेते सतीश बोम्मावार,सभापती अंतबोध बोरकर,सभापती नितेश रस्से,सभापती ज्योती शिंदे,नगरसेवक विजय मूत्यालवार,प्रफुल वाळके, प्रीतम गेडाम,सचिन संगीळवार,सीमा संतोषवार,प्रियंका परचाके, ज्योतीताई गेडाम,शारदा गुरनुले, साधनाताई वाढई ,अंजली देवगडे,गुणवंत सुरमवार,पल्लवी ताटकोंडावार आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.यावेळी या क्रीडा स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरपंचायत चे उपाध्यक्ष संदीप पुण्यपकार यांनी केले.समारोपीय कार्यक्रमाचे संचालन सूरज बोम्मावार यांनी केले तर नगरसेवक प्रफुल्ल वाळके यांनी आभार मानले.यावेळी मोठ्या प्रमाणात क्रीडा प्रेमी उपस्तीत होते.