
राजुरा(संतोष कुंदोजवार)-
छत्तीसगड येथून मजुरांना घेऊन हैद्राबाद येथे जाणारी ट्रॅव्हल्स राजुरा तालुक्यातील विरुर ते धानोरा मार्गातील एक वळणावर पलटी झाल्याने एक ठार तर अनेक जखमी झाल्याची घटना आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली
हैदराबाद येथे मजुरी साठी छत्तीसगड, मध्यप्रदेश मधून मोठ्या प्रमाणात मजूर जात असतात दरम्यान काल दुपारी आपल्या गावावरून 32 प्रवासी घेऊन धनी कँपणीची ट्रॅव्हल्स विरुर ते धानोरा,शिरपूर मार्गे जाण्यास निघाली परंतु रात्री 3 वाजेच्या सुमारास धानोरा गावाजवळली वळणावर ट्रॅव्हल्स पलटी झाली सर्व प्रवासी झोपेत असल्याने अपघात होताच धावपळ सुरू झाली त्यात चेतन रात्रे हा प्रवाशी चा मृत्यू झाला
घटने ची माहिती होताच विरुर पोलीसचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार,ठाणेदार,राजुराचे ठाणेदार योगेश पारधी घटनास्थळी जाऊन जखमींना तात्काळ राजुरा उपजिल्हा रुग्णालयात 11 जखमींना हलविण्यात आले इतर किरकोळ जखमी विरुर दवाखान्यात उपचार सुरू आहे
माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी हे सुद्धा तात्काळ राजुरा येथील दवाखाण्यात जाऊन विचारपूस केली पुढील तपास सुरू आहे
या अपघातग्रस्तांना आपात्कालीन आरोग्यसेवा चे चालक खुशाल लकडे,स्वप्नील देवतळे,विश्वजित झाडे,रोहित जामदार,यांनी पहाटेपासून रुग्ण हलवण्यासाठी अथक परिश्रम केले

