
सावली- सावली येथे मोक्याच्या आणि सुरक्षित ठिकाणी असलेले आदिवासी मूलींचे भाडे तत्वावर असलेले वसतीगृह परीक्षेच्या तोंडावर इतरञ हलविण्याचा जो घाट रचल्या जात आहे. तो अत्यंत चुकीचा असुन मूलींच्या असुरक्षिततेचा आहे. त्यामूळे वसतीगृहातील मूलींच्या दृष्टीकोनातून अपुऱ्या सोयी त्वरित करून पूर्ण करून नवीन इमारती शिवाय वसतीगृह इतरञ हलविण्यात येवु नये.अशी मागणी गोंडवाना गणतंञ पार्टीचे जिल्हा अध्यक्ष बापु मडावी आणि पंचायत समितीचे माजी सभापती शामराव सिडाम यांचेसह अनेक पालकांनी स्थानिक पञकार भवनात आयोजित पञकार परीषदेत केली आहे.

आदीवासी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत मागील चार वर्षापासून सावली येथे ग्रामीण भागातील आदिवासी समाजातील विद्यार्थीना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मोफत आदिवासी वसतीगृह सुरू करण्यात आले.
चंद्रपूर- गडचिरोली मुख्य मार्गावर पत्रकार भवन समोर सुरू असलेले सदर वसतीगृह अपुऱ्या सोयी-सुविधा असल्याचे कारण समोर करून इतरञ स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही बाब गंभीर असुन मूलींच्या सुरक्षिततेचा विचार न करता स्वार्थीभाव जोपासत असल्याचा आरोपही जिल्हाध्यक्ष बापु मडावी यांनी केला. आजच्या स्थितीला वस्तीगृहाचे ठिकाण गावाच्या मध्यभागी असुन सुरक्षित आहे. वस्तीगृहाच्या ठिकाणापासून शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ, दवाखाना या सर्व बाबी जवळ असल्याने विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण जात नाही. तसेच सदर वस्तीगृह सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याच्या निगराणीत आहे.
आदिवासी मुलींचे वस्तीगृह असताना मात्र गृहपाल पदावर हे पुरुष गृहपाल असल्याने विद्यार्थिनी असुरक्षित आहेत. त्यामुळे प्रभारी गृहापाल धनराज डबले यांना त्वरित हटवून महिला गृहपालाची तात्काळ नेमणूक करण्यात यावी. जोपर्यंत वस्तीगृहासाठी नवीन शासकीय इमारत निर्माण होत नाही, तोपर्यंत वस्तीगृह इतरत्र ठिकाण हलवण्यात येऊ नये.अशी मागणी बापू मडावी व शामराव सिडाम यांनी केली.या यासंदर्भात शासनाकडे निवेदन पाठविले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वस्तीगृहाच्या स्थलांतरित करणे संदर्भात प्रभारी गृहपाल धनराज डबले हे आल्यापासून सुरू झाले आहे.त्यांनी वस्तीगृहातील विद्यार्थिनींना दबावतंत्र वापरून वस्तीगृहात सोयी सुविधा नाहीत आम्हाला दुसरे वस्तीगृह पाहिजे अशा प्रकारचे बोलण्यास सांगतात व विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देतात, अशा प्रकारचे निवेदन प्रकल्प अधिकारी चंद्रपूर यांना वस्तीगृहातील विद्यार्थिनी व पालकांनी दिले आहे.वस्तीगृह स्थलांतरित करीत असताना विद्यार्थ्यांच्या पालकांना कुठल्याही प्रकारची सूचना किंवा पालकसभा न घेता प्रभारी गृहपाल यांनी स्वतःच्या मर्जीने निर्णय घेतात अशा प्रकारचे टीका पालकांनी यावेळी केली.
यावेळी पत्रकार परिषेदला गोंडवाना गणतंत्र पार्टी चे सावली तालुका अध्यक्ष संजय मडावी,संजय दलांजे, मानकापुरच्या माजी सरपंच लिलाबाई कड्याम,योगिता कड्याम, प्रांजली दलांजे, माया जुमनाके यांचे सह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
