Home
HomeBreaking Newsविरुर वनपरिक्षेत्र अंतर्गत लक्कलकोट नियतक्षेत्रात नरभक्षक बिबट जेरबंद

विरुर वनपरिक्षेत्र अंतर्गत लक्कलकोट नियतक्षेत्रात नरभक्षक बिबट जेरबंद

राजुरा(संतोष कुंदोजवार)-
दीड महिन्यांपूर्वी राजुरा तालुक्यातील लक्कलकोट येथील एका शेतकऱ्यावर हल्ला करून ठार केलेल्या बिबटला अखेर आज दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी सहाचे दरम्यान जेरबंद करण्यात वनविभागास यश आले आहे.

मध्य चांदा वन विभागाच्या विरुर वनपरिक्षेत्र अंतर्गत लक्कलकोट वनक्षेत्रात दीड महिनेपूर्वी बिबटचा धुमाकूळ सुरू होता त्यातच 3 डिसेंबर रोजी लक्कलकोट येथील एका शेतकऱ्यावर हल्ला करून ठार केले होते शिवाय काही बकर्या फस्त केले होते त्यामुळे वनकर्मचारी त्या बिबटला जेरबंद करण्यासाठी रात्रंदिवस मोहीम सुरू केली होती अखेर आज दिनांक 18 जानेवारी रोजी लक्कलकोट नियतक्षेत्राचे कक्ष क्रमांक 48 मध्ये ठेवलेल्या पिंजऱ्यात बिबट जेरबंद झाला याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव पवार यांनी वरिष्ठ वणाधिकार्याना दिली व मार्गदर्शक सुचनेनुसार कार्यवाई करून आणि वैद्यकीय तपासणी करून चंद्रपूरला हलविण्यात आले.

ही मोहीम उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू,सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव पवार,क्षेत्र सहायक मनोहर गोरे,शेख,सुरेश मांदाडे,रवी वैद्य,एस जी शिंदे,प्रिया लांडगे,नरेश लाडसे, तसेच पी आर टि चे पथक,कोष्टळा कॅम्प मधील वनमजुर,देवाडा ,सिद्धेशवर येथील वनपाल वनरक्षक, यांनी यशस्वी पणे राबविली हा बिबट जेरबंद झाल्याने वनकर्मचारी सोबतच,जनतेनेही सुटकेचा निश्वास सोडला

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !