
सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे *सबका मालीक एक है* या महानाट्य प्रयोगाचे राज्याचे माजी मंत्री तथा ब्रम्हपुरी-सावली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार विजयभाऊ वडेट्टीवार मित्र मंडळ परिवार च्या वतीने दिनांक 23 जानेवारी ला निखिल सुरमवार यांच्या मैदानावर आयोजन केले आहे.

या नाटकाच्या आयोजन संदर्भात आज दिनांक 13 ला दुपारी 4.00 वाजता कांग्रेस नेते दिनेश पाटील चिटनुरवार माजी बांधकाम सभापती यांच्या नेतृत्वात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला सावली तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष नितीन गोहाने, युवा काँग्रेस चे अध्यक्ष आशिष मनबत्तूनवार, कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती हिवराज पाटील शेरकी, सौ भावनाताई बिके उपसरपंच व्याहाड खुर्द यांच्या प्रमुख उपस्थिती बैठक पार पडली.
बैठकीला दिवाकर पाटील काचीनवार, अनिल पाटील म्हशाखेत्री, दिलीप लटारे, केशव भरडकर, दीपक पाटील जवादे, मिथुन ब्राम्हणवाडे, किशोर घोटेकर, सुनील पाल, संचालक खुशाल लोडे, नितीन संगिडवार, या प्रमुख पदाधिकारी उपस्तीत होते.
“सबका मालीक एक है” या महानाट्याचे लाभ जास्तीत जास्त नागरिकांना पोहचवण्यासाठी या यासंदर्भात नियोजन करण्यात आले.विविआईपी पास, व्हीआयपी पास, तसेच पदाधिकारी यांना पास तसेच इतर सर्वांना बैठक व्यवस्था तसेच वाहनांची पार्किंग व्यवस्था इतर अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. सदर बैठक ही भोले शंकर राईसमिल व्याहाड खुर्द इथे पार पडली. यावेळी सावली तालुक्यातील आमदार विजयभाऊ वडेट्टीवार मित्र मंडळ परिवारातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
