*आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती निमित्य पत्रकार दिन साजरा*

52

 

सावली :- सौरव गोहणे 

सावली तालुका पत्रकार संघ सावली,ग्रामीण पत्रकार संघ सावली आणि व्हॉईस ऑफ मीडिया संघ सावली यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका पत्रकार भवन सावली चा सभागृहात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती निमित्य पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

पत्रकार दिन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सूरज बोम्मावार हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार डॉ.षडाकांत कवठे, माजी अध्यक्ष उदय गडकरी,सचिव प्रकाश लोणबले,व्हॉईस ऑफ मिडियाचे अध्यक्ष प्रवीण झोडे,ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सतीश बोम्मावार,पत्रकार चंद्रकांत गेडाम,उमेश वाळके, आशिष दुधे,लोकमत दुधे, बाळू मेश्राम,खोजीद्र येलमुले, प्रा.विजय गायकवाड.डॉ,शेखर प्यारमवार,टीकाराम म्हशाखेत्री,उमेश गोलेपल्लिवार, गिरीश चीमुरकर आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

यावेळी पत्रकार बांधवांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या जीवनावर प्रकाश टाकला.तसेच विविध विषयावर साधक – बाधक चर्चा करण्यात आली.तसेच अखिल भारतीय मराठी परिषदेच्या नागपूर विभागीय साठी सदस्य पदासाठी नावे पाठविली म्हणून डॉ.षडाकांत कवठे यांचे अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.यावेळी सर्व पत्रकारांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.