पत्रकार हा समाज आणि शासनातील दुवा ; पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडू लडके यांचे प्रतिपादन

47

 

चंद्रपूर : लोकशाही देशात पत्रकारितेला मोठे स्थान आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेला ओळखले जाते. त्यामुळे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांवर मोठी जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणिव ठेवून प्रत्येक पत्रकाराने समाजातील चुकीच्या गोष्टी शासनापुढे मांडाव्या. त्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा प्रयत्न करावा. पत्रकार हा खऱ्या अर्थाने समाज आणि शासनातील दुवा असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडू लडके यांनी केले.

मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची आठवण म्हणून जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार संघ भवनात शुक्रवारी ६ जानेवारीला आयोजित पत्रकार दिन समारंभात अध्यक्षस्थानाहून लडके बोलत होते. यावेळी चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री मुरलीमनोहर व्यास, माजी अध्यक्ष श्री चंद्रगुप्त रायपुरे, माजी अध्यक्ष श्री बबन बांगडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

प्रारंभी माता सरस्वती, लोकमान्य टिळक आणि मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.यानंतर उपस्थित मान्यवरांची समायोचित भाषणे झालीत. प्रास्ताविक आणि संचालन सरचिटणीस सुनील तिवारी यांनी केले. रवी नागापुरे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष मोरश्वर राखुंडे, कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ पत्रकार जयंतराव गुडपेकर, सौ. शोभाताई जुनघरे, नामदेव वासेकर,क्षितिज लडके,सिद्धांत लडके, हेमंत रूद्रपवार, विलास खेवले यांच्यासह शहरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.