Home
HomeBreaking News🏏उद्या सावलीत सद्भावना क्रिकेट कप चे आयोजन सावली पोलिस स्टेशन चा उपक्रम

🏏उद्या सावलीत सद्भावना क्रिकेट कप चे आयोजन सावली पोलिस स्टेशन चा उपक्रम

 

सावली(प्रतिनिधी)
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस स्टेशन सावलीच्या वतीने सावली येथील योगी नारायण बाबा क्रीडा संकुलावर दिनांक 7जानेवारीला सकाळी 8:30 वाजता सद्भावना क्रिकेट कप या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

या निमित्ताने सावली येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय, पोलीस स्टेशन सावली, वनविभाग सावली,पाटबंधारे विभाग सावली, तालुका पत्रकार संघ सावली ,तहसील कार्यालय सावली, ग्रामीण रुग्णालय सावली, नगरपंचायत सावली, पंचायत समिती सावली, व्यापारी असोसिएशन सावली यांच्यामध्ये क्रिकेटचे सामने भरवले जाणार आहे.


या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव खेडेकर व सह उद्घाटक उपविभागीय पोलीस अधिकारी मलिकार्जुन इंगळे हे त्यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रथम वर्ग न्याय दंडअधिकारी अक्षय जगताप,सावलीचे तहसीलदार परीक्षित पाटील, नगरपंचायत नगराध्यक्ष लता लाकडे, मुख्याधिकारी अजय पाटणकर, पाथरी पोलीस स्टेशन ठाणेदार मंगेश मोहोळ,सावली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण वीरुडकर, असोलामेंढा प्रकल्प सहाय्यक अभियंता मनोज नाईक, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय डॉक्टर विलास वाघदरे, सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती जगन्नाथ तेलकापल्लीवार, सावली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरज बोम्मावार,ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मुन्ना स्वामी,व्यापारी असोसिएशन सावली अध्यक्ष प्रवीण सुरमवार हे उपस्थित राहणार असून या दिवसभरच्या क्रिकेट सामन्यांचा समस्त जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांनी केले आहे.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !