महात्मा गांधी तंटामुक्त समितीने लावून दिला प्रेमयुगलांचा विवाह

78

 

सावली तालुक्यातील ग्रामपंचायत सोनापूर येथे सरपंच सौ जयश्री मडावी व तंटामुक्त समिती अध्यक्ष कैलास बांबोडे यांच्या पुढाकाराणे प्रेमी युगल देवानंद सुधाकर मारभते व योगिना शंकर टेकाम सोनापूर यांचा दिनांक 04/01/2023 ला दुपारी 2 वाजता लग्न लावून दिले आम्ही दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतो.

 

आम्हाला लग्न करायचा आहे असे सांगत चक्क सोनापूर येथे प्रेम युगलांची भावना लक्ष्यात घेता तंटामुक्त सिमितीने देघील दोघांचा चक्क ग्रामपंचायत येथे विवाह लावला या विवाहला उपस्थित सोनापूर येथील उपसरपंच मुकेश भुरसे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश नागपूरे, नामदेव सोनुले, बंडू बारसागडे माजी तंटामुक्त समितीची अध्यक्ष पांडुरंग कोसरे, प्रशांत भूरसे गजानन भांडेकर प्रकाश सोनुल तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.