
राजुरा(संतोष कुंदोजवार)
कोरपना तालुक्यातील वनसडी वनपरिक्षेत्रात महिन्यापासून धुमाकूळ घालीत एका मुलास ठार केलेल्या बिबट्याला पकडण्यात वनविभागास अखेर यश आले आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास पकडण्यासाठी पिपर्डा परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात तो बिबट अडकला.

वनसडी वनक्षेत्रात गडचांदूर,निजामगोंदी,नोकारी,भेंडवी,आदी गाव परिसरात या बिबट्याने मागील एक महिन्यापासून धुमाकूळ घातला होता
उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू ,सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार यांच्या मार्गदर्शनात वनविभागाचे अतिशीघ्र दल, स्थानिक वन कर्मचारी या बिबटच्या लोकेशन वर ट्रॅप कॅमेरे,आणि पिंजरे ठेवण्यात आले होते आणि रात्र दिवस गटागटाने गस्त करीत होते.
जनतेकडून सारखा दबाब येत होता अश्यातच आज पहाटे चारचे सुमारास पीपर्डा गावालगत ठेवलेल्या पिंजऱ्यात तो बिबट अडकला लगेच वनकर्मचार्यानी वरिष्ठ वणाधिकार्याना माहिती दिली व त्यांचे मार्गदर्शनात पुढील कारवाई करण्यात येत आहे नागरिकही मोठ्या संख्येत बिबट पाहण्यासाठी गर्दी केली होती ,तो बिबट कुठे ठेवणार हे वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱयांनी दिली हा बिबट जेरबंद झाल्याने वन कर्मचारिसह जनतेनेही सुटकेचा निश्वास सोडला
ही मोहीम वनपरिक्षेत्र अधिकारी अरुणा चौधरी यांचे नेतृत्वात क्षेत्र सहायक दिनेश चामलवार,वनरक्षक रवींद्र कूनघाटकर,प्रवीण बोभाटे,महादेव जाधव,करिष्मा पाचभाई, सुरेश नल्लूरवार अतिशीघ्र दलाचे वनपाल बी के पेंदोर,एस जी नगारे ,पी एम मेकेवाड चालक हंसराज दुर्गे तसेच जीवतीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे,बल्हारशाह येथील क्षेत्रसाहायक कोमल गुगलोत, कोरपना,गडचांदूर,पारडी उपक्षेत्रातील वनकर्मचारी यांनी ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली
