अखेर वनविभागाने वाघाला पिंजऱ्यात अडकविले…

102

 

सावली(सूरज बोम्मावार)
वाघाने सुरू केलेला कहर…आणि शेतकऱ्यांत असलेली प्रचंड नाराजी… वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न…यातुन वनविभागाने अखेर आज यश आले.गेल्या 20 दिवसापासून आपल्या कामात असलेल्या वनविभागाला अखेर यश आले.एवढा मोठा वाघ पाहून वनकर्मचारी यांचेही चांगलीच भंभेरी उडाली असल्याचे दिसले.

गेल्या 21 दिवसापासून निलसनी पेडगाव या परिसरामध्ये वाघाने धुमाकूळ घातलेला होता. त्या वाघाला पकडण्याची परवानगी वनमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती.

त्यानुसार वनविभागाने आपली संपूर्ण समूह तैनात करून त्या भागात वाघाला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले होते.शूटर आणि डॉक्टर हे सातत्याने लक्ष ठेवून होते.आज व्याहाड खुर्द उपवनक्षेत्रातील सामदा बिट अंतर्गत नहराजवळ आज पहाटे साडेपाच च्या दरम्यान कंपर्ड नंबर 502 मध्ये वाघ आला त्या वाघाला शूटर बी एम वनकर यांनी त्या वाघाला शूट केले.आणि तो बेशुद्ध झाला.त्यानंतर पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.पि.एन. बशेट्टी यांनी तपासणी करून वाघाला पिंजऱ्यात टाकले.आणि सर्व कर्मचारी यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

सावली वनपरिक्षेत्र अधिकारी पी. जी. विरुटकर,वनपाल कोडापे,वनपाल सूर्यवंशी तसेच सर्व वनरक्षक सह अनेक जण या मोहिमेमध्ये सहभागी झालेले होते.वनविभागाने वाघ पकडल्याची माहिती मिळताच सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून वाघ पकडल्याचा आनंद व्यक्त केल्या जात आहे.