सावली येथे 1 जानेवारीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

43

 

सावली(सूरज बोम्मावार)
सावली येथील ज्ञानज्योती फाउंडेशन तथा माळी समाज सावलीच्या वतीने सावित्रीबाई ज्योतिबा फुले जयंती महोत्सव निमित्त दिनांक एक जानेवारीला भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन महात्मा ज्योतिबा फुले नगरी परिसरात केलेले आहे सदर शिबिराला सकाळी दहा वाजता सुरुवात होणार आहे.

या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांच्या हस्ते होणार असून या शिबिरात डॉक्टर भालचंद्र फालके डॉक्टर प्रशांत पेंदाम डॉक्टर रुपेश सोनवले डॉक्टर विनोद माहुरकर डॉक्टर स्नेहल खोब्रागडे डॉक्टर विनोद मुसळे डॉक्टर बाळू सहारे डॉक्टर अमित गुनुले डॉक्टर पंकज गणवीर डॉक्टर अमित डॉक्टर अपेक्षा बांबोडे डॉक्टर कपिल गेडाम डॉक्टर महेश बोरीकर डॉक्टर तुषार मरलावार डॉक्टर राकेश वनकर डॉक्टर प्रीती कावळे डॉक्टर राकेश गावतुरे डॉक्टर अमयझरकर डॉक्टर किरण कुराडे डॉक्टर दीपक जोगंदळ डॉक्टर खुशाल कावळे डॉक्टर सौरभ गोबाळे डॉक्टर आकाश तुरले डॉक्टर फलहान काझी डॉक्टर प्रणय भगत आधी जन उपस्थित राहून आरोग्य तपासणी करणार आहेत तरी या शिबिराचा समस्त सावली व तालुका वास यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा अशी विनंती ज्ञानज्योती फाउंडेशन तथा माळी समाज सावलीच्या वतीने करण्यात आलेले आहे.