सरपंचाच्या ट्रॅक्टरने केला जीवघेणा खड्डा

89

 

ग्रामपंचायत मेहा बूज अंतर्गत स्थानिक सरपंचाच्या मालकीची ट्रॅक्टर गेल्यामुळे नाली बांधलेला रपटा फुटला. त्यामुळे आता जीवघेणा खड्डा पडला आहे. या संदर्भात नागरिकांनी तक्रारी करून्ही ग्रामपंचायत केले आहे.

गावात जनार्धन निकुरे ते महादेव कोलते यांच्या घराच्या मार्गावर नालीवर रपटा बांधण्यात आला. परंतु त्यावर ट्रॅक्टर गेल्यामुळे तो रपटा फुटला. रपटा फुटून जवळपास दीड महिने होत आहे.

फुटलेल्या रपट्यामूळे जाण्यायेण्यासाठी नागरिकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. लहान मुलांना सुद्धा याचा धोका आहे. जीवित हनी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे, ग्रामस्थांनी केली. मात्र ग्रामसेवक आणि सरपंच यांनी दुर्लक्ष केले आहे.