
अंतरगाव(पंकज कागदेलवार)
मॉर्निंग वाक साठी जात असलेल्या युवकांना आज पहाटे 5:30 वाजता च्या दरम्यान अंतरगाव या गावाच्या वळण रस्त्यावर मोठा बिबट दिल्याने युवकांची भंभेरी उडाली.

सद्या पोलीस भरती साठी गावातील तरुण,तरुणी हे रोज पहाटे धावण्यासाठी रस्त्यावरून जात असतांना आज अचानक काही युवकांना हा बिबट दिसला.त्या बिबट ला पाहताच मोठा बिबट बघून चांगलीच घाबरगुंडी उडाली.या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून युवकांमध्ये व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
