
सावली(सूरज बोम्मावार)
सावली येथील ज्ञानज्योती फाउंडेशन तथा माळी समाज सावलीच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले जयंती समारोहच्या निमित्ताने सामान्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सावली येथील विश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात सदर स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती.

या स्पर्धेकरिता दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती त्यात एकूण 450 हून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला.
सामान्य स्पर्धेला मिळेल ला प्रचंड प्रतिसाद बघता या संपूर्ण स्पर्धेत विजेत्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले जयंती समारोह दिनांक 3 जानेवारी ला बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या आयोजनाकरिता ज्ञानज्योती फाउंडेशन तथा माळी समाजातील पदाधिकारी व युवकांनी अथक परिश्रम घेतले.