
सावली – सौरव गोहणे

दिवसेन दिवस वाहनांच्या संख्येत वाढ होत असून त्यांच्या वेगाच्या संख्येत सुद्धा वाढ झालेली दिसून येत आहे. सकाळी 11 ते 5 हा शालेय वेळ असतो, त्या वेळेत काहींची विद्यालयात जाण्यासाठी तर काही विद्यार्थ्यांना घरी जाण्याची दळवळ चालू असते तर एकी कडे वाहनांच्या वाढत्या भरधाव वेगामुळे अपघाताची शक्यता नकारता येत नाही म्हणून गडचिरोली – सावली – मुल मार्गावर वाढत्या अपघाताची संख्या लक्षात घेता अपघातला आळा घालण्यासाठी सावली तहसील अंतर्गत रस्त्यावर गतिरोधक लावण्यात यावा यासाठी सावली चे तहसीलदार मान. परिक्षीत पाटील साहेब यांना आज वॉइस ऑफ़ मिडिया सावली तालुका संघातर्फे निवेदन देण्यात आले.
सततचे होणारे अपघात आणि अपघातात मृत्यू पडणाऱ्यांची संख्या लक्षात घेता ही मागणी रास्त आहे असे तहसीलदार पाटिल यांनी सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून गतिरोधकांची समस्या लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन तहसीलदार साहेबांनी दिले.
या वेळी व्हॉईस ऑफ मीडिया चे अध्यक्ष प्रवीण झोडे, कार्याध्यक्ष प्रा.विजय गायकवाड,उपाध्यक्ष डॉ.शेखर प्यारमवार, सरचिटणीस नासीर अन्सारी, सहसरचिटणीस उमेश गोलेपल्लिवार,कोषाध्यक्ष नितीन गोहने,कार्यवाहक रुपचंद लाटेलवार,संघटक टीकाराम म्हशाखेत्री,प्रसिद्धी प्रमुख सौरव गोहणे आणि सदस्य चंद्रकांत प्रधाने उपस्थित होते.
