Home
HomeBreaking Newsधान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 15 हजाराचा बोनस जाहीर

धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 15 हजाराचा बोनस जाहीर

 

धान उत्पादक शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी प्रति हेक्टरी १५ हजार रु या प्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम बोनस म्हणून देण्याची घोषणा केल्याबद्दल वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. गेल्या सरकारचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी विधानसभागृहात धानाला बोनस देण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला होता आणि या सरकारने धानाला बोनस जाहीर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे . विद्यमान सरकार हे खरे शेतकऱ्यांचे हित जोपासणारे सरकार असल्याचे सिद्ध झाले असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे धान उत्पादक जिल्ह्यातील ५ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. ही बोनसची रक्कम ऑनलाइन पद्धतीने धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.केंद्र शासनाने राज्याला १५ लाख मेट्रिक टन धान खरेदीसाठी मंजुरी दिली आहे. हा निर्णय शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय आहे. सातत्याने आर्थिक हालअपेष्टा सहन करणाऱ्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला महाविनाश आघाडीने सतत पाने पुसली पण आमच्या सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार दिला असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !