31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर 30,31 ला नाकाबंदी ; सावली पोलीस सज्ज

73

 

30, 31 डिसेंबर रोजी सावली पोलीस स्टेशनच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये नाकाबंदी करण्यात येणार आहे. सावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन गाड्या सतत पेट्रोलिंग साठी राहणार आहे. परवानाशिवाय कोणीही कोणताही कार्यक्रम करू नये तसेच मद्यपान करून वाहने चालविल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच शासनाचे निर्णय राखून दिलेले आहेत त्याचे पालन करून नवीन वर्षाचे स्वागत करावे असे आवाहन पोलीस स्टेशन सावली ते ठाणेदार आशिष बोरकर व त्यांच्या चमुने केले आहे.