जयभीम वाचनालय चा अमृत महोत्सव व ग्रंथालयाचे अधिवेशन संपन्न

66

 

सावली(सौरभ गोहणे)
जयभीम वाचनालय सावली संस्थेचा अमृत महोत्सव समारोह, चंद्रपूर जिल्हा ग्रंथालय संघ व नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे संयुक्त अधिवेशन दिनांक २५/१२/२०२२ ला सकाळी ११ वाजता संपन्न झाले.

या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणुन महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित होते. उद्घाटणीय मार्गदर्शनामध्ये ग्रंथालयाच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच जयभीम वाचनालय सावलीच्या अद्ययावत अभ्यासिकेसाठी २० लाखांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले.

कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणुन महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक मा. दत्तात्रेय क्षीरसागर सर उपस्थित होते. यावेळी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी अधिवेशनाप्रसंगी उपस्थित असलेल्या ग्रंथालय प्रतिनीधींची लक्षणिय संख्या पाहुन मनस्वी आनंद झाला तसेच ग्रामिण भागातील ग्रंथालये जागृकतेने कार्य करतात ही भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच शासनाने ग्रंथालयाचे अनुदान ६० टक्यांनी वाढवुन देण्याचे घोषित केले.

जयभीम वाचनालयाच्या वतीने जयभीम वाचनालयाच्या अध्यक्षा लता एम. लाकडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर नागपुर विभाग ग्रंथालय संघाच्या वतीने नागपुर विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मा. अनिल बोरगमवार यांनी प्रास्ताविक केले.

विशेष म्हणजे मान्यवरांचा सत्कार व स्वागत करतांना पुष्पगुच्छांवर अवास्तव खर्च न करता संविधान ग्रंथ देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले. समारोहाप्रसंगी जेष्ठ सभासदांचा, अभ्यासिकेत अभ्यास करत असतांना सरकारी नौकरीमध्ये स्थान प्राप्त करणा-या गुणवंत विद्यार्थ्यांचा व उत्कृष्ट वाचकांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मा. डॉ. गजानन कोटेवार उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन लता एम. लाकडे, अध्यक्ष, नगर पंचायत सावली, मिनाक्षी कांबळे, सहाय्यक ग्रंथालय संचालक नागपूर, भिमराव जिवणे, जिल्हा ग्रंथपाल, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय चंद्रपूर,अनिलभाऊ बोरगमवार, अध्यक्ष, नागपूर विभाग ग्रंथालय संघ,हरिदास टेंभुर्णे, कार्याध्यक्ष, नागपूर विभाग ग्रंथालय संघ, भाऊराव पत्रे, प्रमुख कार्यवाह नागपूर विभाग ग्रंथालय संघ, संदिपभाऊ गड्डमवार, संचालक, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व इतर मान्यवर उपस्थितीत होते.

या कार्यक्रमाचे सुत्र संचालन ऐश्वर्य लाकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन जयभीम वाचनालयाचे सचिव मा. घनश्याम एस. भडके यांनी केले.