
###########################################################################################################################

(ईश्वर गंडाटे )
सावली तालुक्यातील निमगाव येथे आजच सकाळचा सुमारास गाव तलावात बैल धुण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
निमगाव येथील रोशन गुरुदास चालीगंजेवार वय 30वर्ष हा युवक आज सकाळी आपले बैल धुण्यासाठी गाव तलावात गेला होता बैलधुत असतानाच बैलानी त्याला लाथ मारली व तो जागेवर तलावात कोसळला.
त्यानंतर सदर घटनेची माहिती आजूबाजूला मिळतात त्यांनी रोशनला रुग्णालयामध्ये भरती केले त्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यासाठी नेत असतानाच त्याच्या मृत्यू झाला.
त्याच्या मागे पत्नी ,दोन मुलं आई-वडील भाऊ असा बराच मोठा आप्तपरिवार आहे एक होतकरू युवक चा मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.