
#
राजुरा,(संतोष कुंदोजवार)-
आईवडिल सोबत शेतात गेलेल्या 9 वर्षीय बालकांवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची दुर्दैवी घटना दिनांक 25 डिसेंबर रोजी मध्य चांदा वन विभागाच्या वनसडी वनपरिक्षेत्रातील निजामगोंदी बीट अंतर्गत बेलगाव येथे सायंकाळच्या सुमारास घडली या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे
नितीन आनंदराव आत्राम हा 9 वर्षीय बालक कुटूंबियासह शेतात गेला होता दुपारनंतर झाडाखाली असलेला जेवणाचा डब्बा आणण्यासाठी गेला असता दबा धरून असलेला बिबट्याने त्या बालकांवर हल्ला करून ठार केले त्याच्या ओरडण्याचा आवाज आल्याने शेजारी असलेल्या शेतकऱयांनी धाव घेत बिबट्याला हाकलून लावले परंतु तोपर्यत त्या बालकाचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थ घटनास्थळी जमलेत वन कर्मचाऱयांना याची माहिती दिली माहिती मिळताच वनरक्षक महादेव जाधव मोक्यावर गेले असता त्यांचे दिशेनी लपून बसलेल्या बिबट्याने धाव घेतली परंतु गावकर्याच्या ओरडण्याने वनरक्षक बचावला
लगेच सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी अरुणा चौधरी,क्षेत्रसहायक,वनकर्मचारी, आणि पोलीस कर्मचारी मोक्यावर येऊन पंचनामा करून पुढील कार्यवाहिस बालकाचे शव गडचादूर येथे नेण्यात आले
वनविभागाने मृतक बालकाचे पालकांना तात्काळ 35 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली असून पुढील आर्थिक मदत लवकरच देण्यात येईल असे सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार यांनी सांगितले
या घटनेमुळे मात्र आत्राम कुटूंबियावर दुःखाचा डोंगर कोसडला असून गावातही वाघाची दहशत पसरली आहे मागील अनेक दिवसांपासून या भागात वाघ आणि बिबट्याच्या वावर असल्याने वनकर्मचारी नियमित गस्तीवर आहे तरीपण अशी दुर्दैवी घटना घडल्याने वन विभागासमोर मोठे आव्हान उभे असून बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे