बोथली मध्ये भाजपा ला दाखविला अपक्षांनी हात…

157

सावली(सूरज बोम्मावार) सावली तालुक्यातील सर्वाधिक चर्चत असलेल्या बोथली या गावाचा निकाल काय लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपाच्या सत्तेला अपक्ष उमेदवार उभे राहून सुरुंग लावीत कांग्रेस ने झेंडा फडकवीला आहे.

माजी राज्यमंत्री स्व.वामनराव गड्डमवार यांचे असलेले गाव हे राजकीय दृष्ट्या खूप महत्वाचे गाव आहे. या गावाचे स्वतः वामनराव गड्डमवार हे सरपंच राहून आपल्या राजकीय कारकिर्द ला सुरुवात केली आणि ते लोकनेते व राज्यमंत्री पदापर्यंत नेवून ठेवली. मात्र कालांतराने 1982 मध्ये बोथली मध्ये राजकीय सत्तातरण होत 10 वर्ष 1992 पर्यंत मनोहर ननेवार हे सरपंच होते तर त्यानंतर 2002 प्रकाश पाटील गड्डमवार हे सरपंच पदावर विराजमान होते. त्यानंतर 5 सुवर्णलता गड्डमवार यांनी गावातून सरपंच पदी होते. त्यानंतर 2007 पासून 2022 पर्यँत यामिनी कोरेवार,दीपाली मडावी,खलिता मराठे या सरपंच पदी होत्या म्हणजे गेली 15 वर्ष भाजपा चे जेष्ठ नेते प्रकाश पाटील गड्डमवार यांचेच मार्गदर्शन होते.

15 वर्षांपासून ची सत्ता हटविण्यासाठी कांग्रेस तर्फे नरेश गड्डमवार हे सक्षम उमेदवार यांनी येन निवडणूक मध्ये दोन पाऊल मागे येत युवा ब्रिगेड मधून कंत्राटदार व्यवसाय असलेला सुशील नरेड्डीवार ला पुढे केल्याने निवडणूक चुरशीची होईल असे चित्र तयार केले आणि भाजपा समर्थक चे मते फुटली पाहिजे त्याच हिशोबाने काहींना टोचणी देत निवडणूकीच्या रिंगणात उभे केले.याचा सरळ सरळ नुकसान हा भाजपा च्या उमेदवार ला बसला असेच एकंदरीत चित्र दिसत आहे.

कारण सरपंच पदाकरिता कांग्रेस तर्फे सुशील नरेड्डीवार तर भाजपा कडून मधुकर मुप्पावार रिंगणात होते. तसेच अपक्ष उमेदवार म्हणून सतीश
गड्डमवार ,प्रवीन नंनेवार,निलेश पुटकमवार,धनराज भडके हे मैदानात होते. परिस्थिती बघता अपक्ष उमेदवारांचा टिकाव लागणार नाही असे चित्र असतानाच सतीश गड्डमवार यांनी 219 ,प्रवीण नंनेवार यांनी 140,निलेश पुटकमवार 140 मते घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आणि यातच भाजप उमेदवार मधुकर मुप्पावार यांना पराभव स्वीकारावा लागला आणि कांग्रेस चे उमेदवार सुशील नरेड्डीवार यांचा विजय सुकर झाला.

एकंदरीतच अपक्षांचा राजकीय मैदानी खेळाने मात्र राजकिय पक्षांना घाम फुटले हे नक्कीच या निकालावरून दिसत आहे.

बोथली येथील काँग्रेस पक्षाने आपली पद्धत बदल करीत प्यानल वर भर दिला आणि त्यात सरपंच पदाचे उमेदवार सुशील कवडू नरेड्डीवार हे विजयी ठरले तर ग्रा.प.सदस्य म्हणून कार्तिक सुनील मराठे,अमोल मुप्पावार,कविता अलाम,शारदा पाडेवार,विजय यादवराव गड्डमवार,प्रज्ञा वाळकेप्रतिमा भोयर यांनी तर भाजप चे विलास वाळके व नीता मराठे यांनी विजय संपादन केले आहे.