ग्रामपंचायत निवडणूकित बोथली,नवेगाव तुकुम कांग्रेस कडे तर गेवरा बूज भाजपा कडे

109

 

सावलीSaoli(सूरज बोम्मावार)

“ब्रम्हपुरी-सावली विधान सभा क्षेत्रात ग्रामपंचायत च्या निवडणूक मध्ये विजयी झालेल्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचे या क्षेत्राचे आमदार माजी मंत्री विजयी वडेट्टीवार यांनी अभिनंदन केले आहे.

 

आज सावली तालुक्यातील बोथली,नवेगाव तुकुम व गेवरा बुज येथील ग्रामपंचायत निवडणूक 2022 पार पडली त्यात बोथली येथील काँग्रेस पक्षाचे विजयी उमेदवार
सरपंच पदासाठी – सुशील कवडू नरेड्डीवार हे विजयी ठरले तर ग्रा.प.सदस्य म्हणून कार्तिक सुनील मराठे,अमोल मुप्पावार,कविता अलाम,शारदा पाडेवार,विजय यादवराव गड्डमवार,प्रज्ञा वाळके प्रतिमा भोयर यांनी तर भाजपचे विलास वाडके व निता मराठे यांनी विजय संपादन केले.

तसेच नवेगाव तुकुम ग्रामपंचायत निवडणूक काँग्रेस विजयी उमेदवार सरपंच पदासाठी – नीता जनार्धन ठाकरे हे विजयी झाले.तर सदस्य म्हणून साईनाथ बाबुराव मडावी,अश्विनी धाकेश पेंदाम,दामिनी सोमेश्वर भोयर,जयश्री प्रभाकर भोयर,महेंद्र रघुनाथ वालदे व भाजपा चे दोन जन हे विजयी झाले.

गेवरा बूज ग्रामपंचायत निवडणूक मध्ये सरपंच पदाकरिता भाजप चे मोहन चनावार हे विजयी झाले मात्र ग्रामपंचायत सदस्य मध्ये काँग्रेस येथील उमेदवार विजयी झाले.त्यात पारेश्वर माधव चौधरी,धनराज आको गेडाम,करुणा लोकमित्र खोब्रागडे,राजेंद्र नामदेव ननावरे
कविता हिवराज चौधरी,मिनाक्षी मुरलीधर गरमडे
सरिता विजय कोसमशिले आदी उमेदवार विजयी झाले.

या विजयी उमेदवारांचा आमदार विजय वडेट्टीवार जनसंपर्क कार्यालय सावली येथे हार घालून व पेढे भरवून कांग्रेस चे जेष्ठ नेते दिनेश पाटील चिटनूरवार यांनी अभिनंदन केले यावेळी विजय कोरेवार माजी.सभापती प.स.सावली,नितीन गोहणे तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी सावली,बाजार समिती सभापती हिवराज शेरकी,पांडुरंग मेश्राम, रुपाली कन्नाके सह तालुक्यातील जेष्ठ कार्यकर्ते नेते व असंख्य नागरिक या विजय उत्सवात उपस्थित होते.