राजुरा तालुक्यातील तीन ग्रामपंचायत कांग्रेसच्या ताब्यात तर एक ग्रामपंचायत भाजपच्या हाती

52

राजुरा,प्रतिनिधी

राजुरा तालुक्यात झालेल्या चार ग्रामपंचायत निवडणुकीत विरुर स्टेशन,डोंगरगाव,हरदोना,या ग्रामपंचायत मध्ये भारतीय कांग्रेस पक्षाचे सरपंच तर देवाडा ग्रामपंचायत मध्ये भाजपाचे सरपंच निवडून आले आहेत
राजुरा तालुक्यात देवाडा,विरुर स्टेशन,हरदोना,डोंगरगाव या चार ग्रामपंचायत मध्ये निवडणूक पार पडली आज दिनांक 20 डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणी नंतर भाजप साठी प्रतिष्ठेसाठी असलेली विरुर स्टेशन ग्रामपंचायत मध्ये कांग्रेसचे अनिल बंडू आलांम निवडून आले असून 7 सदस्य कांग्रेसचे ,शेतकरी संघटनेचे 2,अपक्ष 1 तर केवळ एक जागीच भाजपचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत केवळ गटबाजीत भाजपाची गच्छंती झाल्याची चर्चा सुरू आहे,डोंगरगाव ग्रामपंचायत मध्ये कांग्रेसचे इंदिरा बंडू मेश्राम सरपंच तर 1सदस्य कांग्रेसचे,भाजपाचे 2,बहुजन वंचितचे 4,गोंडवाना गणतंत्र पार्टीचे 2 सदस्य निवडून आले आहेत ,हरदोना खुर्द ग्रामपंचायत मध्ये कांग्रेसचे सगुणाबाई मेश्राम आणि 8 कांग्रेस आणि 1 गोंडवाना गणतंत्र पक्षाचे सदस्य निवडून आले आहेत तसेच देवाडा ग्रामपंचायत मध्ये भाजपाचे शंकर मडावी ,सह 4 भाजपा,7 कांग्रेसचे सदस्य निवडून आलेले आहेत.

राजुरा तहसील कार्यालयात आज मतमोजणी करण्यात आली मतमोजणी शांततेत होण्यासाठी महसूल कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱयांनी योग्य बंदोबस्त ठेवला होता
एकंदरीत तालुक्यात या निवडणुकीत तीन ग्रामपंचायमध्ये कांग्रेस आणि एका ग्रामपंचायत मधेच भाजपचे सरपंच म्हणून सत्ता काबीज करता आली