व्हाईस ऑफ मीडियाची सावली तालुका कार्यकारणी गठीत…

113

 

SAOLI :- सौरव गोहणे 

सावली- पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी लढा पत्रकारिता आणि पत्रकारसाठीचा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा संपादक संदीप काळे आणि सहकार्याने निर्माण केलेल्या व्हाईस ऑफ मीडियाचे राज्यध्यक्ष,संपादक राजा माने नागपूर विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक आणि चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांच्या निर्देशानुसार व्हाईस ऑफ मीडियाचे सावली तालुका अध्यक्ष प्रवीण झोडे यांनी रविवार 18 डिसेंबर रोजी बैठक घेऊन सावली तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली या बैठकीला शहर आणि तालुक्याच्या विविध ठिकाणावरून आलेले पत्रकार उपस्थित होते.
या बैठकीत प्रविण झोडे अध्यक्ष पदी.डॉ.चंद्रशेखर प्यारंमवार उपाध्यक्ष पदी.प्रा. विजय गायकवाड कार्यध्यक्षपदी , नासीर अंसारी सरचिटणीस पदी ,उमेश गोलेपल्लीवार सह सरचिटणीस पदी ,नितीन गोहने कोषाध्यक्ष,रूपचंद लाटेलवार कार्यवाहक पदी, टिकाराम मशाखेत्री संघटक, सौरभ गोहणे प्रसिद्ध प्रमुख पदी ,तर कार्यकारणी सदस्य म्हणून डॉक्टर प्रमोद सोनवणे चंद्रकांत प्रधाने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .