पुराने नुकसानग्रस्त असलेल्या शेतकऱ्याची कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या..

145

 

सावली : सावली तालुक्यातील शिर्शी येथील शेतकरी सखाराम पुंजाजी निकुरे वय 65 वर्ष यांनी दिनांक 18 ला कीटकनाशक प्राशन केले त्यानां रुग्णालयात भरती केले असता चंद्रपूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

वैनगंगा नदी जवळ त्याचे शेत आहे.यावेळी मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने शेत पाण्याने खरडले मात्र त्यांचे उत्पन्न गेले. निसर्गाच्या लहरीपणामुळे गरजा भागवण्यापुरते तरी उत्पन्न होईल की नाही, किंबहुना होणारच नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह व घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी ह्या विवंचनेतून हा प्रकार घडला असल्याचे वर्तविण्यात येत आहे.

शेतीसाठी बँकेचे कर्ज घेऊन शेती केली, मात्र निसर्गाच्या प्रकोपाने शेतीचे नुकसान झाल्याने कर्जाची परतफेड करण्याचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. ह्या विवंचनेतूनच त्यांनी विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.

त्यांच्या पश्चात दोन पत्नी, चार विवाहित मुले, एक मुलगी, नातवंड व आप्त परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.