बोगस आदीवासी हटाव मागणी साठी आदीवासी संघटनेचा मोर्चा सावली तहसिल कचेरीवर धडकला

81

 

सावली(प्रतिनिधी) अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली व विविध आदिवासी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बोगस आदिवासीवर कारवाई करण्यात यावी, या संदर्भात धडक मोर्चाचे आयोजिन शुक्रवार रोजी करण्यात आले, यावेळी आदीवासी संघटनेचे केशव तिराणीक ,गुलाब मडावी, जनार्दन गेडाम ,अतुल कोडापे, बापुजी मडावी, जितेश कुळमेथे,अशोक उईके,तुकाराम गेडाम, महिपाल मडावी, प्रदीप गेडाम, कुणाल कोवे प्रविण गेडाम, योगिता पेंदाम, लखन मेश्राम, यशवंत ताडाम,क्रिष्णा कन्नाके, एकनाथ कन्नाके, राजु कोडापे, लखन मेश्राम, युवराज उईके,आदी आदिवासी बांधव उपस्थित होते.

धडक मोर्चाची सुरुवात आदिवासी वस्तीगुसापासुन करण्यात आली ,सोबतच सावली शहराच्या मुख्य मार्गाने तहसील कचेरीवर नेण्यात आला.

तहसील कार्यालया समोर छोटेखानी कार्यक्रमातुन मोर्चाच्या मुख्य मागण्या मुल ,सावली,सिंदेवाही या तालुक्यातील वरठी,धोबी यांनी नामसाधर्मा चा फायदा घेत धोबा करून आदीवासींच्या सवलती लाटण्याचा जात चोरांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासह धोबा जमात प्रमाणपत्र तात्काळ रद्द करणे,6 जुन 2017नुसार बोगस आदीवासींना सेवेतून बडतर्फ करण्याबाबत त्या सर्वोच्च न्यायालयीन निकालाची त्वरीत.अमंलबजावणी. करण्याबाबत ,जे अधिकारी जमात निहाय योग्य शहानिशा न करता बोगस जात प्रमाणपत्र प्रदान करतात अशा अधिका-यावर.फौजदारी गुन्हा सह सेवेतून निष्कासित करावे, चंद्रपूर जिल्हामधील भुमीहीन.लोकांचे संरक्षण करून मोफत शासकीय जमीन देण्यात यावे.

आदिवासी अतिक्रमीत शेतकऱ्यांना विनाअट तात्काळ जमीनीचे पट्टे देण्यात यावे,संविधानातील 5 व 6 व्या अनुसुचीची अमंलबजावणी करण्यात यावी,गैर आदिवासी खोटे जातप्रमाणपत्र सादर करून 12500 पदे बडकावली आहे ,ते पद रद्द करून ख-या आदींवासी चा समावेश करावा, अशा विविध मागण्यांसाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

धडक मोर्चाच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद.युवा जिल्हा अध्यक्ष अतुल कोडापे,तालुका अध्यक्ष प्रविण गेडाम, यासह गोंडवाना संघटना, बिरसा दल,बिरसा क्रांती, बिरसा ब्रिगेड,आफरोट,इंडियन ट्रायबल वालेंटिअर,आग्रनाशन ,जागर,अशा संघटना व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.