Home
Homeमहाराष्ट्रझाडे कुणबी जातींना धनगर जातीचे प्रमाणपत्र देऊ नये - शिष्टमंडळाने दिले निवेदन

झाडे कुणबी जातींना धनगर जातीचे प्रमाणपत्र देऊ नये – शिष्टमंडळाने दिले निवेदन

सावलीSAOLI (सौरभ गोहणे)

तालुक्यातील झाडे कुणबी या जातीच्या लोकांनी धनगर या मुख्य जातीतील तत्सम जात झाडे या जातीच्या नामसदृश्याचा गैरफायदा घेत जात प्रमाणपत्र मिळवून घेत सोयी सवलती मिळवीत आहेत.

त्यामुळे जुने पुरावे तपासल्याशिवाय प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी सावली तहसीलदार यांचेकडे धनगर समाज शिष्टमंडळाने केली आहे
भटक्या जमाती क प्रवर्गात धनगर व इतर तत्सम जाती येतात. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात झाडे कुणबी ही जात असून इतर मागास प्रवर्गात येते मात्र या लोकांनी कुणबी हा शब्द वगळून फक्त झाडे ठेऊन भटक्या जमाती क ची प्रमाणपत्र मिळवीत सोयी सवलतीचा लाभ घेत आहेत.

त्यामुळे गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात धनगर झाडे ही जमात नसल्याने जुने पुरावे तपासणी केल्याशिवाय जात प्रमाणपत्र देण्यात येऊ नये अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीचे नागपूर विभाग अध्यक्ष डॉ तुषार मर्लावार यांचे नेतृत्वात तहसीलदार सावली यांना निवेदन दिले. यावेळी माजी सभापती विजय कोरेवार, डॉ नारायण करेवार, चांदलीचे सरपंच विठ्ठल येगावार, सोमेश्वर कंचावार, राजू कंचावार, विनोद नेरडवार, मारोती उमलवार, लचमा सिरगावार आदी उपस्थित होते

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !