
SAOLI दि.15(सौरभ गोहणे)

सावली जवळ रुद्रापूर येथे काल एका शेतकऱ्यांचा बळी गेल्यानंतर चोवीस तासात पुन्हा सावली पासून 3 किमी अंतरावरील खेडी येथे वाघाच्या हल्ल्यात स्वरूपा प्रशांत येलेटीवार वय 50 वर्ष ही महिला ठार झाली आहे.
शेतात कापूस काढत असताना हा हल्ला झालेला असून घटनेची माहिती वनविभाग सावली ला देण्यात आली.घटनास्थळी वनविभाग व पोलीस ची चमू पोहचली आहे.या घटनेने परिसरातील शेतकरी चांगलेच भयभीत झाले आहे.
