आत्ताची ब्रेकींग न्यूज… शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला ;शेतकरी जागीच ठार

167

तालुक्यातील दुसरी घटना

सावली-SAOLI(सौरभ गोहणे)(दिनांक-14 डिसेंबर )

सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सावली पासून 5 किमी अंतरावरील रुद्रापूर येथील शेतकरी बाबुराव बुद्धाजी कांबळे वय 65 वर्ष हे दैनंदिन प्रमाणे आपल्या शेतीकडे जाण्यासाठी निघाले असता वाटते दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्या वर हल्ला करीत त्यांच्या मानेला पकडून वाघ हा जंगल परिसरात घेऊन गेला.वाघ माणसाला नेत असल्याचे दिसून येताच गावकरी त्या घटनास्थळा वरून त्या दिशेने गेले व पाहणी करू लागले.या घटनेची माहिती वनविभाग सावली व पोलीस स्टेशन सावली ला देण्यात आली.दोन्ही चमू घटनास्थळी उपस्तीत झाले.

घटनास्थळा पासून काही दूर अंतरावर बाबुराव कांबळे यांचे मानेपासून खाल्लेले प्रेतच सापडले.त्यानंतर वनविभागाने पंचनामा करून शव विच्छेदन साठी प्रेत सावली ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे.या घटनेने मात्र खळबळ माजली असून शेतकरी भयभीत झाले आहे.

सावली तालुक्यातील या आठवड्यात ही दुसरी घटना घडली असून वाघाचा बंदोबस्त करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.