तलाव बचाव कृती समिती तर्फे माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या सत्कारj

49

 

सिंदेवाही (प्रतिनिधी)

चंद्रपूर जिल्हा तलाव बचाव कृती समिती तर्फे माजी मंत्री श्रीमती शोभाताई फडणवीस यांचा शाल श्रीफळ, साडी चोळी व सन्मान चिन्ह देउन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम ताल्लेवार सभागृह सिंदेवाही येथे पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रलालजी मेश्राम माजी न्यायमूर्ती तसेच महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हे होते. प्रमुख उपस्थिती चिमुर निर्वाचन क्षेत्राचे आमदार किर्तिकुमार भांगडीया हे होते. या कार्यक्रमात नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, भंडारा जिल्हा मच्छिंमार संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे, प्रा. डॉ राजेश डहारे, गुलाबराव भानारकर, अविनाश जगताप, गजेंद्र चाचरकर, हितेश सुचक, उपस्थित होते.

 

माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी मच्छिंमार संस्थांना जाचक असणाऱ्या शासकीय नियमावलीस बदलवन्यास मदत केली. व भविष्यात भोई समाजास अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमात आमदार किर्तिकुमार भांगडीया यांनी मासेमारांचे प्रश्न येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात येईल अशी ग्वाही दिली. नगराध्यक्ष स्वप्नील कावळे यांनी सिंदेवाही ला मासोळी बाजार साठी नवीन जागा देण्यात येईल अशी घोषणा केली. सम्मान कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रलाल मेश्राम यांनी एकजूट राहुन सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी पाठिंबा ध्यावे अशी भावना व्यक्त केली.

प्रा. डॉ राजेश डहारे सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली तसेच संचालन श्रीहरी शेंडे यांनी व आभार दिवाकर डहारे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुखरुजी मारबते, यादवराव मेश्राम, जितेंद्र हींगूसले, मिनाक्षी मेश्राम, महादेव चाफले यांनी सहकार्य केले. हजारो समाज बांधव व मासेमारी संस्थांचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी या कार्यक्रमात उपस्थिती लावली.