
निलसनी पेठगाव येथील शाळेच्या मागील भागातील टेकडी या परिसरात सरपण साठी गेलेल्या कैलास लक्ष्मण गेडेकर वय 46 वर्ष या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्याला जागीच ठार केले असून त्याच्या पायाकडील भागा हा वाघाने खाल्याचा प्रकार पुढे आलेला आहे.या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे.

कैलास गेडेकर हा जंगल परिसरात सरपण आणण्यासाठी गेलेला होता मात्र रात्र होऊन ही परत न आल्याने त्याच्या परिवार व इतर गावकऱ्यांनी आज सकाळ पासून त्याची शोधा शोध सुरू केली त्यात जंगल परिसरात काही अंतरावर अर्ध शरीर खाल्लेले प्रेत सापडले.त्यानंतर वनविभागाला याची माहिती देण्यात आली असून वनविभागाची चमू घटनास्थळी पोहचून पंचनामा केलेले आहे.
मृतक कैलास गेडेकर यांच्या मुलीचे लग्न जुळले आहे.
त्यामुळे हळू हळू सरपण जमा करण्यासाठी हे या परिसरात गेले होते. त्यांच्या मृत्यने सर्वत्र खळबळ माजली असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
