Home
Homeमहाराष्ट्रवीज पंपाची वीज तोडणे थांबवा अन्यथा फटके

वीज पंपाची वीज तोडणे थांबवा अन्यथा फटके

 

चंद्रपुर जिल्हयातील शेतक-यांचा खरीप हंगाम गॉगलगाय, सततचा पाऊस, परतीचा पाऊस, मुसळधार पाऊस
अशा विविध कारणानी पिके हातची गेल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच आता रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच महावितरणने थकीत वीज बिलापोटी शेतक-यांच्या वीज पंपाची विजतोडणी करण्याची मोहीत हातात घेतली आहे. त्यानुसार सर्वच तालुक्यामध्ये महावितरणाच्या अधिकारानी धडक वसुली मोहीम राबवत हजारो शेतक-यांचे विज
पुवठा खंडीत केली आहे. त्यामुळे शेतक-यांचे विज पुरवठा खंडीत करणे थांबवा. शेतक-यांचे कृषी पंपाचे वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे.

 

यावर्षी पाऊस चांगला
झाल्याने शेतीसाठी भरपुर पाणी उपलब्ध आहे. पाण्याचा वापर शेतक-यांनी भात लागवड, सायोबीन लागवड, भाजीपाला
लागवड, टरबुज लागवड सुरु केली आहे. तसेच रब्बी हंगामातील गहु, हरभरा, ज्वारी, करडी, जवस या पिकांची पेरणी
केली आहे. सध्या रब्बीचे पिक बहारत आहे. अशा परिस्थितीत महावितरणाने शेतक-यांना खिंडीत पकडून वसुली सुरु
केली आहे. खरेतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा आयोगाने शेतक-यांच्या शेतीचा विज पुरवठा पीक निघेपर्यंत त्वरीत खंडीत करु नये
असा आदेश वीज कंपन्यांना दिला आहे. परंतू या आदेशास केराची टोपली दाखवत महावितरणाने वसुली सुरु केली
आहे. वास्तविक पाहता ज्या थकीत वीज बीलापोटी विज पुरवठा खंडीत केला जात आहेत.

ते विज बिलच बेकायदेशीर
आहेत सरसरी / अंदाजे किंवा मिटरचा फोटो न काढता बिल आकारणे बेकायदेशीर आहे. (ग्रा.सं. का. १९८३ पटी क्र.
१३६८५, दि. ६/५/२००५ भरपाई प्रती आठवडा १००/-) सध्याचे शेतीपंपाचे विज बिले आहेत ते सर्वच बिले मिटरचा फोटो न काढता सरासरी बिल दिलेले आहेत. त्यामुळे हे शेतकऱ्यांना येत असलेले विजेचे बिल बेकायदेशीर असल्याने विज बिल
जेवढा वापर आहे. त्यानुसार दुरुस्त करुन मिळेपर्यंत ते भरण्याचा संबंधच येत नाही. यासोबतच विज कयदा २००३ शेक्शन ५६ नुसार थकबाकी बिलासाठी
विज पुरवठा बंद करायचा असेल तर १५ दिवस अगोद स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य असते. परंतु महावितरण कंपनीने अनेक शेतकऱ्याचे विज कनेक्शन हे कसल्याही प्रकारची नोटीस न देता बेकायदेशीर रित्या कपात केलेली आहे. तसेच विज कायदा २००३ व लायसन्स रुल्स २००५ नुसार शेतात पोल, टिपी असल्यास प्रति महा रु.२०००/- ते ५०००/- रुपये(भरपाई) भाडे मिळूशकते. परंतु महावितरणाने आजपर्यंत एकाही शेतकऱ्यास हे भु भाडे दिलेलेनाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे
पैसे महावितरणकडे निघतात. त्यामुळे हे भुभाडयाचे पैसे महावितरणने शेतकऱ्यांना व्याजासहीत द्यावेत ही आमची मागणी आहे.

 

तसेच सध्या ट्रान्सफार्मर बंद पडल्यास महाविंरणचे अधिकारी बिल भरल्याशिवाय आम्ही ट्रान्सफार्मर बंदचा रिपोट
पाठविणार नाही अशी भुमिका घेऊन शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने विज बिलाची वसुली करुन घेत आहेत. परंतु विज बिल
भरुन अधिकाऱ्यांनी रिपोर्ट करुनही ऑईल उपलब्ध नाही, दुरुस्ती करणारे कर्मचारी कमी आहेत, तुमच्या अगोदर खुपवेटींग आहेत असे कारण सांगुन १५-१५ दिवास ट्रान्सफार्मर शेतकऱ्यांना मिळत नाही. खरे तर विज कायदा २००३
शेक्शन ५७ नुसार ग्रामीण भागात ट्रान्सफार्मर बिघाड झाल्यास ४८ तासात विज कंपनीने तो दुरुस्त करून देणे अनिवार्य
आहे.

 

अन्यथा विज कंपनीने शेतकऱ्यांना प्रति विलंब तासास रु. ५०/- प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी लागते. परंतु ही थकीत
नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कधीच मिळाली नाही. ती नुकसान भरपाई महाविरतणाने शेतकऱ्यांना द्यावी. तसेच फ्युज
गेल्यामुळे व अन्य कारणाने ग्रामीण भागात २४ तासापेक्षा अधिक काळ जर विज पुरवठा खंडीत झाला तर ग्राहकांना प्रति
विलंब तासास ५०/- नुकसान भरपाई मिळते. ग्रामीण भागात तर २४ तासापेक्ष अधिक काळ विज जाण्याचे प्रकार अनेक
वेळा घडतात त्यामुळे ती सुध्दा नुकसान भरपाईची रक्कम महाविरणाकडे थकीत आहे. ती सुध्दा थकीत नुकसान भरपाई
शेतकऱ्यांना महाविरणाने तात्काळ देणे गरजेचे आहे.

 

तसेच शेतकऱ्याने कृषि पंपासाठीचे कोटेशन भरल्यानंतर विज कंपनीने १ महिण्याचे आत विद्युत जोडणे सुरु
करुन दिली पाहीजे. परंतु महाराष्ट्रात लाखो शेतकऱ्यांना कोटेशन भरल्यानंतरही १-१ वर्षे विज जोडणी करुन मिळत नाही.
त्यासाठी ही महावितरणाने शेतकऱ्यांना प्रति आठवडा १००/- रुपये प्रमाणे कायद्यानुसार नुकसान भरपाई देणे बंधनकारक
आहे. मात्र अशी नुकसान भरपाई महाविरणाने एकाही शेतकऱ्यास दिलेली नाही.

 

बेकायदेशिरपणे सुरु असलेली विज बिल वसुलीसाठी विज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम थांबवावी. दादागिरीने
व बेकायदेशीरपणे विज पुरवठा खंडीत करणे तात्काळ थांबवावे. अन्यथा महाराष्ट्रातील नवनिर्माण शेतकरी सेना आपल्या
बेकायदेशिर वसुली करणा-या कर्मचा-यांना आसुडाचा प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही. तसेच आपणास सरळ मार्गाने न
समजल्यास मनसे तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल व होणा-या परिणामास आपले प्रशासन जबाबदार असेल.

आजचं निवेदन प्रदेश अध्यक्ष : संतोष नागरगोजे साहेब यांचे मार्गदर्शनात प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी , राज्य उपाध्यक्ष दिलीप रामिडवार यांचे सूचनेनुसार देण्यात आले.
या निवेदनास देतांना जिल्हा अध्यक्ष मनसे शेतकरी सेना आनंद बावणे , मनसे शहर अध्यक्ष सचिन भोयर , जिल्हाध्यक्ष मनसे कामगार सेना नितीन भोयर , मनसे जिल्हाध्यक्ष जनहित भाऊ , जिल्हाउपाध्यक्ष जनहित कक्ष काळबांधे , जिल्हा सचिव किशोरभाऊ मडगूळवार , जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ मडावी , तालुका उपाध्यक्ष सावली प्रभाकर भांडेकर , तालुका उपाध्यक्ष सावली स्वप्नील पेटकर , विजय ढोलने , शहर पदाधिकारी नितीन सोनटक्के , महेश भाऊ , सुमित भाऊ , उपस्थित होते.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !