Home
Homeमहाराष्ट्रकुष्ठांतेय सक्षमीकरण दिनी अल्सर केअर कॅम्पचे आयोजन

कुष्ठांतेय सक्षमीकरण दिनी अल्सर केअर कॅम्पचे आयोजन

 

================
सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था (गडचिरोली व चंद्रपूर जिल्हा), नागभिड च्या वतीने ५ डिसेंबर हा *कुष्ठांतेय सक्षमीकरण दिन समारंभ* उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
या प्रसंगी कुष्ठांतेय सक्षमीकरण दिनाचे औचित्याने *स्पेशल अल्सर केअर कॅम्प* चे आयोजनही करण्यात आले होते.

 

वडसा, ब्रह्मपुरी व नागभीड तालुक्यातील काही कुष्ठरुग्णाच्या वर्षानुवर्ष पायाला असलेल्या अल्सरच्या जखमात सुधारणा होत नसल्याने त्यांच्या पायाला *पीओपी कास्ट* लावून दोन महिन्यातच त्यांच्या जखमेत पूर्णतः सुधारणा घडवून आणता येते यासाठी अल्सर केअर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ५ व्यक्तीवर उपचार करण्यात आलेला आहे.

या कुष्टांतेय सक्षमीकरण दीन समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेचे उपाध्यक्ष तुकाराम गेडाम होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव चंद्रशेखर कन्नाके, कार्यकारी सदस्य गीताताई गहाणे, शालू दिघोरे, गुरुदेव भुरसे, श्री.कोठेवार, टेक्निकल सपोर्ट पार्टनर अलर्ट इंडिया मुंबईचे कार्यक्रम प्रमुख व सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेचे सल्लागार आशुतोषजी प्रभावळकर, अवार्ड संस्थेचे अध्यक्ष शमा शेख हे उपस्थित होते, यावेळी तांत्रिक मार्गदर्शक म्हणून अलर्ट इंडियाचे प्रकल्प समन्वयक अभिजीत कांबळे, अन्सारी, संदीप माटे, शरद निकुरे, प्रशांत जांभुळकर, धीरज साखरे व समाज प्रवर्तक उपस्थित होते.

 

याप्रसंगी नुकतीच हैद्राबाद येथील 21वी जागतिक कुष्ठरोग परिषद मध्ये सहभागी होऊन पेपर सादरीकरण केलेले सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेचे प्रतिनिधी श्रावण हांडेकर, अश्विनी ननावरे, नारायण उरकुडे, लता दांडेकर यांचा सत्कार करण्यात आला. जागतिक परिषदेत आलेला अनुभवाचे आधारे सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमान संस्थेची भविष्यकालीन अधोरेखित भूमिका व कार्यक्रमाची आखणी प्रस्तुत करण्यात आली.

यात कुष्ठांतेयाच्या कुटुंबात फॅमिली एज्युकेशन, समुदायातील कुष्ठांतेयांच्या विकृती केअर कॅम्पचे आयोजन, गाव ते जिल्हा स्तरावरील विविध समित्यांची संघटनात्मक बांधणी करून संस्थेचे बळकटीकरण करणे, संसाधनात्मक साधने उपलब्ध करणे निधी संकलनच्या माध्यमातून समुदायातील कुष्ठांतेयांच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावणे या उपक्रमाची अमलबजावणी संस्था करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कुष्ठांतेयाचे कुष्ठांतेयांनी कुष्ठांतेयकरिता चालवलेली समुदायातील संघटना तथा कुष्ठांतेय सक्षमीकरणाची ही मोहीम अधिक बळकट करणारे कुष्ठांतेय किंवा त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थेला लाभार्थी म्हणून न पाहता त्यांना जबाबदार भागीदार म्हणून स्थान प्राप्त करण्याच्या उद्देशाने आज कुष्ठांतेय सक्षमीकरण दिन दरवर्षी साजरा करण्यात यावा असे प्रतिपादन आशुतोष प्रभावळकर यांनी केले आहे.
या कार्यक्रमाला चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील कुष्ठातेय बंधूंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे संचालन अश्विनी नन्नावरे यांनी केले, प्रास्ताविक श्रावण हांडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन नारायण उरकुडे यांनी केले. या कार्यक्रमा च्या यशस्वीेसाठी मिलिंद बारशिंगे, विशाखा बठे, यांनी अथक परिश्रम घेतले.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !