शेतकऱ्यांचा क्षेत्रीय प्रशिक्षण अभ्यास दौरा संपन्न्

41

 

(ईश्वर गंडाटे )
राज्याच्या विविध क्षेत्रात अवलंबील्या जानाऱ्या शेतीविषयक नवनव्या तंत्रज्ञानाची माहीती प्रत्यक्ष पाहणी व अभ्यासातुन अवगत करुन अवलंबन होण्याचे हेतुन शेतकऱ्यांच्या क्षेत्रीय प्रशिक्षण सहलींचे आयोजन विविध योजना अंतर्गत कृषि विभागाच्या वतीने दर वर्षी केल्या जाते.
त्याच अनुषंगाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2022-23 अंतर्गत नुकतेच उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय चंद्रपुर यांचे वनिने चंद्रपुर,मुल,बल्लारशा व सावली या चार तालुक्यातील 60 शेतकऱ्यांचे पाच दिवसीय क्षेत्रीय प्रशिक्षण सहलीचे आयोजन बारामती परीसरात करण्यात आले.

सहलीची सुरुवात चंद्रपुर येथुन उपविभागीय कृषि अधिकारी श्री चंद्रकांत ठाकरे, उपविभागीय कृषि अधिकारी यांचे हस्ते हीरवी झेडी दाखवुन करण्यात आली. क्षेत्रीय प्रशिक्षणा पुरंदर तालुक्यातील सासवड (दिवे) येथे आयोजीत सिताफळ पिक लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षणास सहभाग घेन्यात आला. तसेच जाधववाडी येथील कोरड फळपिके संशोधन केंद्रास भेट देउुन सिताफळ व अंजिर पिकांचे लागवड व प्रकीया तंत्रज्ञानाची माहीती घेन्यात आली तसेच सिताफळ प्रक्रिया युनिट व एव्हरग्रीन मायक्रोन्युट्रीएन्ट प्रा.ली.चे जैविक खते निर्मीती केंद्रास भेट देउुन पाहणी व अभ्यास करण्यात आले. वाळुज येथील नितीन फुडस प्रोसेसिंग युनिटला भेट देुवुन सिताफळ, अंजिर, आंबा व इतर फळांचे प्रक्रियेबाबत पाहणी व अभ्यास करण्यात आले. परीसराती विविध शेतकऱ्यांचे शेततात नाविन्यपुर्ण अशा फुलशेती, ड्रॉगणफ्रुट, दाळींब, सिताफळ, अंजिर, उुस, लसुन व कांदा पिकांचे लागवड प्रक्षेत्रांना भेट देवुन अभ्यासपुर्ण पाहणी करण्यात आली.

 

तसेच बारामती तालूक्यातील ॲग्रीकल्च्रल डेव्हलपमेंट ट्रस्टा, बारामती संचालीत माळेगाव येथील कृषि विज्ञान केंद्रास भेट देउुन मधुकक्षिका पालन, मत्स् पालन, कुक्कुट पालन, पशुपालन,पॉलीहाउुस, शेडनेट हाउुस, एकात्मिक ऍक हाउुस, स्वयंचलीत सुक्ष्म्सिंचण प्रकल्प, मल्चींगवरील भाजीपाला, विविध फळपिके व भाजीपाला सुधारीत लागवड इत्यादी नवनव्या तंत्रज्ञान प्रकल्पांना भेट देउुन पाहणी व अभ्यास कान्यात आले.

 

प्रवासादरम्यान मार्गावरील शिंदखेड राजा, मयुरेश्वर गणपती, जेजुरी, शनिसिंगणापुर व अन्य् ठिकानांवर भेट देउुन एैतीहासी,धार्मीक व पर्यटन स्थळांना भेट देउुन दर्शन घडविन्यात आले. परतीचे प्रवासात सहभागी शेतकऱ्यांनी यवतमाळ येथे भोजन प्रसंगी स्वयंप्रेरणेने कार्यक्रमाचे आयोजन करुन कृषि विभागाचे आभार मानले.
शेतकरी सहली दरम्यान डॉ.मिलींद जोशी,शास्त्रज्ञ, अल्पेश वाघ्, नितीन क्षिरसागर सर्व के.वि.के. बारामती, डॉ. प्रदिप दळवे, डॉ. युवराज बालगुडे, नितीन इंगळे, प्रगत शेतकरी, वाळुंज यांनी सहकार्य व मार्गदर्शन केले.

 

सहलीचे यशश्विते करीता दौरा प्रमुख म्हणुन दिनेश पानसे, कृषि पर्यवेक्षक, भाष्क्र गायकवाड, कृषि सहाय्य्क, रोषन पवार, कृषि सहाय्य्क, सोनाली घोगरे, कृषि सहाय्य्क, व्ही.डी.कुटे, कृषि सहाय्य्क, राजेंद्र देवरा, दौरा व्यवस्थापन कंत्राटदार यांनी उपविभागीय कृषि अधिकारी श्री रविंद्र मनोहरे यांचे मार्गदर्शनात जबाबदारी पार पाडली. तसेच भाष्कर लाडे, राजेश अनंतलवार, इश्वर गंडाटे, हरीदास मेश्राम, मनोज बोदलकर, किशोर कुनघाडकर, समिर घरत आदी व सर्व सहभागी शेतकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.